मानलं भावा: अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पठ्ठ्याने घेतल्या २० गाई, ४४ कोटींची करतोय कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 03:12 PM2021-05-18T15:12:24+5:302021-05-18T15:31:13+5:30
इंदुकूरीनं खरगपूर येथून IITचे शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मास्टर्स व Polymer Science and Engineering मध्ये Ph. D. पूर्ण करण्यासाठी तो अमहेर्स्ट येथील University of Massachusettsयेथे गेला.
किशोर इंदुकूरी ( Kishore Indukuri) IITच्या माजी विद्यार्थ्यानं अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला अन् आज तो वर्षाला ४४ कोटी कमावतो आहे. भारतातील मिडल क्लास कुटुंबात जन्मलेल्या इंदुकूरीनं खरगपूर येथून IITचे शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मास्टर्स व Polymer Science and Engineering मध्ये Ph. D. पूर्ण करण्यासाठी तो अमहेर्स्ट येथील University of Massachusettsयेथे गेला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला गलेलठ्ठ पगाराची नोकरीही मिळाली.
पण, सहा वर्ष नोकरी केल्यानंतर शेतीवर आपलं खरं प्रेम असल्याची जाणीव त्याला झाली आणि त्यानं त्याबाबत विचार करण्यास सुरू केला. त्याच्या कुटुंबीयांची कर्नाटक येथे शेती आहे आणि इंदुकुरी कधीकधी तेथे भेट द्यायचा व वडिलांशी चर्चा करायचा. पण, २०१२मध्ये अखेरीस त्यानं अमेरिकेतील जॉब सोडला अन् मायदेशात परतला. सुरुवातीला तो हैदराबाद येथे राहिला अन् दुधावर संशोधन केलं. आपल्या शहरात सुरक्षित दुध मिळणं किती अवघड आहे, याची त्याला जाण झाली.
''शेती करण्यासाठी मी माझी नोकरी सोडली. मी हैदराबाद येथे राहिलो. तेथे हे समजले की स्वस्त व स्वच्छ दुध मिळणे किती कठीण आहे, याची जाण मला झाली. यात मला बदल करायचा होता आणि तो बदल फक्त माझा मुलगा, माझे कुटुंब यांच्यासाठीच नव्हता, तर हैदराबादमधील नागरिकांसाठी होता,''असे इंदुकुरीनं Yourstory.com ला सांगितले. संशोधनानंतर त्यानं हैदराबादमध्ये स्वतःची डेअरी सुरू केली आणि कोईम्बतूर येथून 20 गाई खरेदी केल्या. त्यानं सदस्यता तत्वावर व्यवसाय सुरू केला आणि त्याच्या ग्राहक संख्येत वाढ झाली. 2016मध्ये त्यानं 'Sid's Farm' नावाची स्वतःची कंपनी रजिस्टर्ड केली.
आजच्या घडीला त्याचे 10 हजाराहून अधिक ग्राहक आहेत आणि 120 कर्मचारी त्याच्या कंपनीत काम करतात. तो वर्षाला 44 कोटी कमावतो. त्यानं सुरूवातीला या व्यवसायात 1 कोटींची गुंतवणूक केली. ''हो सोपा प्रवास नव्हता. सुरुवातीला मी 20 गाई खरेदी केल्या आणि ग्राहकांच्या घरोघरी जाऊन दुध पोहोचवण्याचं काम केलं. माझ्या या प्रयत्नात कुटुंबीयांनी मोठी मदत केली. मी माझी बचत केलेली सर्व रक्कम यात गुंतवली आणि कुटुंबीयांनीही मदत केली. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला,''असे इंदुकुरीनं सांगितले.