जिंकलस पोरी! आई वडिलांनी कधी शाळा पाहिली नाही, मुलीनं यशाचं शिखर गाठत देशात नाव कमावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:20 PM2021-10-20T12:20:26+5:302021-10-20T12:21:26+5:30

एडवान्स परीक्षेच्या रँकिंगमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे सोनम अंगमोला चॉप ५ आयआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल

JEE Advanced Result: Sonam Angmo will study in Top IIT, girl who Parents Never Went To School | जिंकलस पोरी! आई वडिलांनी कधी शाळा पाहिली नाही, मुलीनं यशाचं शिखर गाठत देशात नाव कमावलं

जिंकलस पोरी! आई वडिलांनी कधी शाळा पाहिली नाही, मुलीनं यशाचं शिखर गाठत देशात नाव कमावलं

Next

आयुष्यात यश मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत आणि जिद्द उराशी बाळगावी लागते. भलेही हे यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठीण संघर्षाचा सामना करावा लागला तरी चालेल. जर मनात निश्चित केले आणि यशाचं शिखर गाठाल तर कुणीही तुम्हाला अडवू शकत नाही. परिस्थिती अत्यंत बिकट असली तरी तुमच्या कतृत्वानं एक दिवस तुम्ही सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनता. हे हिमाचल प्रदेशातील एका मुलीच्या प्रवासाकडे पाहिल्यावर तुम्हाला दिसून येईल.

अत्यंत हलाखीच्या परिस्थिती जगणारं कुटुंब, ज्या आईवडिलांनी कधी शाळेची पायरी चढली नाही त्यांच्या मुलीनं जेईई एडवान्स परीक्षेच्या एसटी प्रवर्गातून संपूर्ण देशात ७० व्या रँकवर उत्तीर्ण झाली आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीतीच्या छालिंग गावात सोनम अंगमो हिला देशातील टॉप आयआयटीत प्रवेश मिळणं निश्चित झालं आहे. सोनम अंगमो आणि तिचं कुटुंब मयाड खोऱ्यातील छालिंग गावात राहतं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजतागायत इथं मोबाईल आणि इंटरनेट नेटवर्क पोहचलं नाही. मुलभूत सुविधांपासूनही हे गाव वंचित आहे.

शेतीवर संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे. तरीही आई पदमा देचिन आणि वडील नोरबू यांनी हिंमत हरली नाही. अंगमोनं जिद्दीनं आयुष्यात काहीतरी बनायचं या हेतूने पुढे वाटचाल करत राहिली. सोनम अंगमोनं पाचवीपर्यंत प्राथमिक शिक्षण छालिंगच्या शाळेतून घेतले आहे. त्यानंतर ती स्पीतीचिया लरी नवोदय शाळेत शिकण्यासाठी गेली. १० वीनंतर जेएनवी कुल्लू येथून १२ वी परीक्षा पास केली. त्यानंतर जेईई मुख्य परीक्षा देत अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली.

एडवान्स परीक्षेच्या रँकिंगमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे सोनम अंगमोला चॉप ५ आयआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. तर आई वडिलांनी मुलीच्या यशावर गर्व आहे परंतु आयआयटी काय आहे याचीही कल्पना त्यांना नाही. मुलगी इंजिनिअर होईल इतकंच आईवडिलांना माहिती आहे. सोनमच्या यशाने छालिंगच्या गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. याआधी सोनमनं JEE Mains परीक्षेत ९८.२ टक्क्यांनी उत्तीर्ण झाली होती.

Web Title: JEE Advanced Result: Sonam Angmo will study in Top IIT, girl who Parents Never Went To School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा