"मृत्यू डोक्यावर होता तरीही..."; YouTuber च्या जिद्दीनं त्याचं आयुष्यच बदललं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 08:12 AM2022-12-26T08:12:45+5:302022-12-26T08:13:28+5:30
आज देशातील प्रसिद्ध यूट्यूबरपैकी एक रचित आहे. कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा असे तो व्हिडिओ बनवतो.
नवी दिल्ली - सोशल मीडियाच्या या युगात कलागुण असणाऱ्यांना मोठा वाव मिळाला आहे. केवळ थोडी हिंमत आणि जिद्द असायला हवी. जर मनात निश्चय केला तर यशाचं शिखर गाठण्यापासून तुम्हाला कुणी रोखू शकत नाही. यूट्यूबर रचित रोझाची कहाणी अशीच आहे. रचितमध्ये काहीतरी करून दाखवण्याचं जिद्द होती. ज्यामुळे तो आज सोशल मीडिया स्टार बनला आहे. अत्यंत कमी कालावधीत रचितचे ० ते मिलियन्स सब्सक्राइबर कसे बनले जाणून घेऊया.
IIT ची तयारी करत होता रचित
दिल्लीत राहणारा रचित IIT ची तयारी करायचा. रुचित म्हणतो की, माझ्या वडिलांना वाटायचं मी इंजिनिअर व्हावं. पण मी हे करू शकत नाही हे मला माहिती होतं. एकेदिवशी मी आशिष चंचलानीचा व्हिडिओ पाहिला. ज्यात सर्व कॅरेक्टर तो स्वत: निभावतो. मग माझ्या मनात विचार आला ही अशी फिल्ड आहे जी मी करू शकतो.
त्यानंतर मी माझा पहिला व्हिडिओ बनवला. लोकांनी खूप ट्रोल केले. लोकांच्या कमेंट्स पाहून खूप वाईट वाटले. परंतु सर्वकाही सहन करण्याची ताकद ठेवली. मी व्हिडिओ बनवायचो पण शेअर केले नाहीत. लोक खिल्ली उडवतील अशी भीती वाटायची. परंतु हळूहळू मी काही व्हिडिओ शेअर करणे सुरू केले. अनेकांनी ट्रोल केले पण १-२ जणांनी कौतुक केले. मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तेव्हा वडिलांनी याला स्पष्ट नकार दिला. मी व्हिडिओ बनवणार नाही असं त्यांना खोटं सांगितले. पण व्हिडिओ बनवत राहिलो.
एका मुलाखतीत स्वत:चा अनुभव शेअर करताना रचित म्हणाला की, माझ्या आयुष्यात एक बॅड पॅच आला. माझ्या आजीला टीबी होता. त्यांच्याकडून मला टीबी झाला. मृत्यूही झाला असता. जर उपचार महाग असते तर वाचू शकलो नसतो. आईनं माझी भांडीही वेगळी केली. आता आयुष्यात काहीच नाही. एक रुम होता. पलंग होता आणि मी. टीबी असतानाही व्हिडिओ बनवायचो असं त्याने सांगितले. आज देशातील प्रसिद्ध यूट्यूबरपैकी एक रचित आहे. कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा असे तो व्हिडिओ बनवतो. त्याच्या चॅनेलला ११ मिलियन फॉलोअर्स आहेत. आज त्याच्याकडे घर, कार, पैसे आणि चाहते सगळं काही आहे. देशी व्हिडिओसाठी रचित फेमस आहे. त्यामुळे म्हणतात ना...जिद करो, आगे बढो...