मुंबईला गेलेले जमील शाह सेलिब्रिटी शू-मेकर; बिहारमधून गेले होते डान्सर बनण्यासाठी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 05:55 AM2022-01-21T05:55:34+5:302022-01-21T05:56:05+5:30
१९९८ मध्ये जमील डान्सर बनवण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आले. लोकल ट्रेनमध्ये त्यांनी पर्स विकल्या. नंतर बुटाच्या कंपनीत काम केले. नंतर लेदर कंपनीत त्यांना कामाची संधी मिळाली. डान्सर होण्यासाठी त्यांनी क्लास लावला.
- विभाष झा
पाटणा : वयाच्या १२व्या वर्षी डान्सर बनण्यासाठी बिहारमधून मुंबईला आलेले जमील शाह यांनी बाॅलिवूडमध्ये स्टारपद नाही मिळवले, पण ते स्टार्सना आपण बनवलेल्या बुटांवर नाचायला लावतात. बाॅलिवूडमधील कलाकार आधी डान्सिंग शूज़ विदेशांतून मागवायचे.
१९९८ मध्ये जमील डान्सर बनवण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आले. लोकल ट्रेनमध्ये त्यांनी पर्स विकल्या. नंतर बुटाच्या कंपनीत काम केले. नंतर लेदर कंपनीत त्यांना कामाची संधी मिळाली. डान्सर होण्यासाठी त्यांनी क्लास लावला.
जमील यांच्याकडे डान्सिंग शूज घेण्याएवढे पैसे नव्हते. त्या दिवसांत कोरियोग्राफर संदीप सोपारकर यांनी जमील यांची आर्थिक स्थिती आणि अप्रकट गुणवत्ता पाहून त्यांना तुम्हीच डान्सिंग शू बनवा, असा सल्ला दिला. जमील यांनी २००७ मध्ये स्वत:साठीच पहिल्यांदा डान्सिंग शू बनवले.
जमील यांनी बनवलेले शू त्यांच्यासोबत डान्सिंग शिकत असलेल्या मित्रांना खूप आवडले. मग त्यांनीही त्यांच्याकडून शूज बनवून घेतले व येथून डान्सिंग शू बनवण्याचा प्रवास सुरू झाला.
दोन ते २० हजार रुपयांपर्यंत किंमत
अभिनेते आमिर खान, नोरा फतेही, ऋतिक रोशन, क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली हेदेखील जमील यांनी बनवलेल्या बुटांचे चाहते आहेत. त्यांच्या बुटांना विदेशांतूनही मागणी आहे.
बघता-बघता जमील शू मेकर बनले. त्यांनी शाह शूज नावाचे दुकान सुरू केले. जमील यांनी बनवलेल्या बुटांची किंमत दोन हजारांपासून २० हजारांपर्यंत आहे. जमील म्हणाले की,“ मी बनवलेले बूट घालून ४ ते ५ तास डान्स केला जाऊ शकतो.