वडिलांचं छत्र हरपलं तरीही लेकीनं हिंमत हरली नाही; रोडवेज बस दुरुस्त करून कुटुंबाला सावरलं
By प्रविण मरगळे | Published: December 16, 2020 12:32 PM2020-12-16T12:32:44+5:302020-12-16T12:32:54+5:30
सोनी आठ बहिणींमध्ये तिसऱ्या नंबरची आहे. सोनीच्या उत्पन्नामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. सोनी हिसार आगारात दररोज बस दुरुस्त करते.
हिसार – नोकरी लागण्याच्या ५ दिवसांपूर्वी वडिलांची सावली मुलीच्या डोक्यावरून हिरावली. वडिलांच्या मृत्युने सगळ्यांनाच धक्का बसला होता, पण २२ वर्षीय मुलगी सोनी हिने हिंमत हरली नाही. कुटुंबाचा आधार म्हणून ती उभी राहिली आणि हरियाणा रोडवेजच्या हिसार डेपोमध्ये नोकरीला लागली. हिसार गावची रहिवासी असलेली सोनी आज हिसार आगारात यांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.
सोनी आठ बहिणींमध्ये तिसऱ्या नंबरची आहे. सोनीच्या उत्पन्नामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. सोनी हिसार आगारात दररोज बस दुरुस्त करते. सोनीचे कार्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. इतकेच नाही तर मार्शल आर्ट्स पंचॅक सिलेट गेममध्ये सोनी एक उत्तम खेळाडू राहिली आहे. सोनीचे वडील नरसी यांचे आजारपणामुळे २७ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले. आई मीना देवी गृहिणी आहेत. विशेष म्हणजे सोनी ३१ जानेवारी २०१९ रोजी हिसार आगारात यांत्रिकी सहाय्यक पदावर रुजू झाले.
राष्ट्रीय मध्ये सलग तीन सुवर्णपदके जिंकली
सोनीने पंचक सिलाट गेममधील मार्शल आर्टच्या राष्ट्रीय स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्णपदक जिंकले आहेत. सोनीला स्पोर्ट्स कोट्या अंतर्गत हिसार डेपोमध्ये यांत्रिकी सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली. पेंचक सिलाट हा मार्शल आर्टचा सर्वात सुरक्षित प्रकार आहे, कारण यामुळे सहभागींना त्यांच्या विरोधकांच्या चेहऱ्यावर मारण्याची परवानगी नसते.
वडिलांना खेळायला प्रेरित केले
मुलगी खेळाडू बनून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवेल हे वडिलांचे स्वप्न होते. सोनीने वडिलांच्या सांगण्यावरून सन २०१६ मध्ये खेळायला सुरुवात केली. तसेच सलग तीन सुवर्णपदके जिंकली. स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत तिला ग्रुप डीमध्ये नोकरी मिळाली.
आधी कबड्डी नंतर पंचक सिलेट खेळायला सुरुवात
सोनीने सुरुवातीला आपल्या गावात रजाळी येथे कबड्डी खेळायला सुरुवात केली पण कबड्डीची संपूर्ण टीम तयार होऊ शकली नाही. एके दिवशी तिची खेड्यातील मैत्रिण सोनियाशी भेट झाली. यादरम्यान, सोनियाने सोनीला पेंच सिलॅट गेममध्ये सहभागी होण्यास सांगितले. काही दिवसांनंतर, सोनीने गेममध्ये प्रवेश केला आणि पदके आणण्यास सुरूवात केली.