मनमाड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 11:28 PM2021-07-18T23:28:54+5:302021-07-19T00:16:18+5:30
मनमाड : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी मुस्लीम बांधवांना शासन परिपत्रकाची माहिती देत, ईद ही शासनाच्या गाईडलाईननुसार साजरी करण्यात यावी असे आवाहन केले.

मौलाना तौसिफ यांनी ईद शासनाच्या नियमानुसार साजरी करू अशी ग्वाही देत मनोगत व्यक्त केले. फुले, शाहू, आंबेडकर मुस्लीम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी ईदनिमित्त जनावरांच्या वाहतुकीतील अडचणीसंबंधी सहकार्य करण्याची विनंती केली.
यावेळी जामा मस्जिद ईमाम मौलाना असलम रजवी, हाजी मकसूद साहब, बब्बू भाई शेख, हाजी जुबेर, कयाम सैय्यद, कादिर शेख, अकबर शेख, रईस फिटर, आरिफ पेंटर, निसार शेख, जावेद कुरेशी, असलम मुल्लाजी आदी समाज बांधव उपस्थित होते.