पतीचे देशसेवेचे व्रत ती करणार पूर्ण; पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट, 29 तारखेला भारतीय सैन्यात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:43 AM2021-05-26T10:43:55+5:302021-05-26T10:44:54+5:30
२०१९साली दहशदवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. Pulwama Martyr Major Vibhuti Shankar Dhoundiyal's Wife Nikita Kaul Is Set To Join Indian Army On May 29
२०१९साली दहशदवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ( Central Reserve Police Force ) ताफ्यावर दहशतवाद्यांनी कार बॉम्बच्या मार्फत केलेल्या हल्ल्यात भारताचे ४० जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या हल्ल्यानंतर काही दिवसानंतर पुलवामान येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजर विभूती शंकर धौंडीयाल ( Major Vibhuti Shankar Dhoundiyal ) हे शहीद झाले. याहीपेक्षा वाईट बातमी म्हणजे ९ महिन्यांपूर्वीच विभूती यांचे लग्न झाले होते. ९ महिन्यांच्या संसारानंतर २७ वर्षीय नितिका कौल धौंडीयाल ( Nikita Kaul Dhoundiyal ) यांच्या आयुष्यात मोठं संकट आलं.
Today I hold my head down as an Indian by looking at Mr Nikita Kaul Dhoundial wife of Martyr Vibhuti Shankar Dhoundial who got killed protecting me and 1.25 billion Indians. 😐😥
— V For Vivek (@vickky48) February 19, 2019
Respect to all those families of Indian Army. #PulwamaAttack#PulwamaTerrorAttacks#JaiHindpic.twitter.com/Kev1GHm6lK
पण, मेजर धौंडीयाल यांचं बलिदान निकिता यांनी व्यर्थ जाऊ दिलं नाही आणि पतीच्या जाण्याचं दुःख विसरून त्यांनी स्वतः भारतीय सैन्यात दाखल होण्याचा धाडसी निर्णय घेतला. पतीच्या निधनाच्या सहा महिन्यानंतर निकिता यांनी Short Service Commission (SSC) चा फॉर्म भरला आणि त्या परिक्षेत उत्तीर्णही झाल्या. Services Selection Board (SSB) त्यांची मुलाखतही घेतली आहे.
#NationAlwaysFirst. Maj Vibhuti Dhoundiyal, SC made the #SupremeSacrifice on 18 Feb 19 at #Pulwama. His wife Ms Nitika Kaul Dhoundiyal has cleared the Short Service Commission exam & SSB. Now awaits the merit list. #ChinarCorps salutes the brave lady for her great courage. pic.twitter.com/jIfdClVipt
— Chinar Corps🍁 - Indian Army (@ChinarcorpsIA) February 20, 2020
त्यानंतर चेन्नईत त्यांनी Officers Training Academy (OTA) प्रशिक्षण घेतलं आणि आता २९ मे २०२१ ला त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट निकिता कौल धौंडीयाल म्हणून रुजू होणार आहेत. मागील वर्षी त्यांनी हरयाणा पोलिसांना १००० प्रोटोक्टीव्ह किट्सही दान केले होते. त्यासाठी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी त्यांचे आभारही मानले होते.