मुलगी असावी तर अशी! इंजिनिअर तरुणी कुटुंबासाठी बनली टॅक्सी ड्रायव्हर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 09:37 AM2023-05-04T09:37:39+5:302023-05-04T09:38:02+5:30
बीटेक (इलेक्ट्रिकल) पूर्ण झाल्यावर दीप्ताने ६ वर्षे विविध कंपन्यांत काम केले
कोलकात्याची दीप्ता घोष ही तरुणी बीटेक इंजिनिअर होती, पण अचानक ती उबेरमध्ये टॅक्सी ड्रायव्हर म्हणून कामाला लागली. परम कल्याण सिंह नावाच्या प्रवाशाने अलीकडेच तिच्याबाबत एक पोस्ट केली अन् ती व्हायरल झाली आहे.
बीटेक (इलेक्ट्रिकल) पूर्ण झाल्यावर दीप्ताने ६ वर्षे विविध कंपन्यांत काम केले. पण, २०२० मध्ये वडिलांचा मृत्यू झाला आणि आई व छोट्या बहिणीची जबाबदारी तिच्यावर आली. अन्य शहरांमधून नोकरीच्या बऱ्याच ऑफर येत होत्या, पण आई-बहिणीला सोडून जायचे नव्हते. त्यामुळे तिने ड्रायव्हर बनण्याचा कठोर निर्णय घेतला, कार खरेदी केली आणि २०२१ पासून उबेरमध्ये रुजू झाली. ती ६-७ तास कॅब चालवून महिन्याला सुमारे ४० हजार रुपये कमावते आणि कुटुंब खूश तर मी खूश असे सांगते. कुटुंब आणि करिअर यापैकी एक निवडणे सोपे नसते, मुलगी असावी तर अशी, अशा प्रतिक्रियांसह नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.