"नवरा मृत्यूच्या उंबरठ्यावर अन् बायको नाचतेय..."; कारण ऐकून तिचं कौतुकच वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 12:49 PM2023-02-23T12:49:01+5:302023-02-23T12:50:24+5:30

त्यात पतीला कॅन्सर झाल्याचं कळाले तेव्हा तिच्या आयुष्याने वळण घेतले. तेव्हा तिला दीड वर्षाची मुलगीही होती.

Social media star peehu yadav share her emotional story behind struggle | "नवरा मृत्यूच्या उंबरठ्यावर अन् बायको नाचतेय..."; कारण ऐकून तिचं कौतुकच वाटेल

"नवरा मृत्यूच्या उंबरठ्यावर अन् बायको नाचतेय..."; कारण ऐकून तिचं कौतुकच वाटेल

googlenewsNext

नवी दिल्ली - ही कहाणी आहे अशा महिलेची, जिला लोकांनी विशेषत: नातेवाईकांनी बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. जेव्हा या महिलेचा पती कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी लढत होता तेव्हा ही महिला व्हिडिओ बनवून सोशल मीडियात टाकत होती. या व्हिडिओत ती डान्स करताना दिसायची. तिच्या या कृत्यामुळे नातेवाईकांनी सातत्याने सासू-सासऱ्यांना फोन करून सुनावले पण कुणीही तिने हे करण्यामागचे कारण विचारण्याचा प्रयत्न केला नाही. या महिलेचे नाव पीहू यादव. जी सोशल मीडियावरील डान्सर, यूट्यूबर म्हणून प्रसिद्ध चेहरा बनली आहे. 

पीहू तिच्या देशी अंदाज आणि हरियाणवी डान्ससाठी फेमस झालीय. आज लाखो लोक तिला फॉलो करतात. परंतु यशाचं हे शिखर गाठण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जोश टॉक्समध्ये या महिलेने तिची गोष्ट सांगितली आहे. पीहू दिल्लीमधील आहे. तिचं लग्न नजफगढच्या छोट्या गावात करण्यात आले होते. ती मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. डान्स असो अथवा कुठला खेळ लहानपणापासून तिला समस्या उद्भवल्या. तिला गायनात करिअर बनवायचं होते. परंतु कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नाही. कमी वयात पीहूचं लग्न करण्यात आले. त्यात पतीला कॅन्सर झाल्याचं कळाले तेव्हा तिच्या आयुष्याने वळण घेतले. तेव्हा तिला दीड वर्षाची मुलगीही होती. पीहूने हा कठीण काळही सोसला आणि पतीला बरे करूनच घरी घेऊन आली. 

नातेवाईकांनी साथ दिली नाही
पतीच्या उपचारासाठी पैशांची गरज होती. तिच्या घरातील बचतीचे सर्व पैसे जवळपास संपलेच होते. पीहूने नातेवाईकांकडे मदतीची याचना केली. तेव्हा एका मित्राकडून अशा प्लॅटफॉर्मची माहिती मिळाली ज्यावर व्हिडिओ बनवल्यावर पैसे मिळतात. पीहूने सुरुवातीला डान्स व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली. पतीला वाचवण्याची केवळ १० टक्केच संधी होती. तेव्हा पतीकडून तिने व्हिडिओ बनवण्याची परवानगी घेतली. पतीनं पाठिंबा दिल्यानंतर पीहूने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. पहिल्या, दुसऱ्या व्हिडिओला रिपॉन्स मिळाला नाही. जितके व्हिडिओ अपलोड करायची त्या आठवड्याचं पेमेंट मिळायचं. मग पीहूने जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. 

व्हिडिओमधून कमाई
तिने पुढे सांगितले की, तिसऱ्या दिवशी व्हिडिओ पोस्ट केला आणि पुढील दिवशी सकाळी व्हिडिओ व्हायरल झाल्याचं समजले. त्यावर १२ लाख व्ह्यूज आले होते. यानंतर तिला आठवड्याच्या शेवटी ४००० रुपये, दुसऱ्या आठवड्यात ६००० रुपये आणि नंतर तिसऱ्या आठवड्यात ३०००० रुपये मिळाले. नंतर तिला कॅटेगिरी निवडण्यास सांगितली तेव्हा तिने डान्स निवडले. या काळात ती प्रसिद्ध झाली. नातेवाईकांनी घरी फोन करण्यास सुरुवात केली. ती नाचणारी आहे, पैशांसाठी करतेय. लाज वाटत नाही. नवरा मरणाच्या दारावर आहे आणि हीचं पाहा. ती व्हिडिओ बनवतेय. ती त्याला सोडून पळून जाईल. नवरा आजारी पडला आहे, ती त्याचा फायदा घेईल असं बोलू लागले. 

...अन् नवऱ्याची तब्येत सुधारली
पीहू म्हणाली, माझ्या मुलीला रोज घरी सोडून मी पतीला भेटायला हॉस्पिटलमध्ये जात असे. प्लेटलेट्स/रक्तासाठी वणवण भटकत होते. लोकांनी मदत करण्यास नकार दिला. नातेवाइकांनी साथ देण्याऐवजी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी खचली तेव्हा पतीने सांगितले की मी कोणत्याही परिस्थितीत तुझ्यासोबत आहे. इथूनच मला धीर आला. अशा परिस्थितीत मी व्हिडिओच्या पैशातून सर्व गरजा पूर्ण केल्या. सहा महिन्यांनी माझा नवरा बरा होऊन घरी आला. आर्थिक संकटही दूर झाले आणि नवऱ्याची प्रकृतीही आता चांगली आहे. 
 

Web Title: Social media star peehu yadav share her emotional story behind struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.