होय, शक्य आहे! फुल टाइम जॉब करत गाठलं यशाचं शिखर; UPSC परीक्षेत पास होऊन बनली IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 03:27 PM2021-10-25T15:27:09+5:302021-10-25T15:28:29+5:30
फुल टाइम जॉब करत UPSC परीक्षांची तयारी करणं सोपं नाही. त्यासाठी वेळेचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान होतं
नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(UPSC) च्या नागरी सुविधा परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षेपैकी एक मानली जाते. त्यासाठी देशभरातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. काहींना यश मिळतं पण अनेकांना अनेक संघर्ष करूनही पास होणं शक्य होत नाही. नागरी सुविधा परीक्षा २०२० मध्ये कर्नाटकात राहणाऱ्या अपर्णा रमेशनं हिनं ही परीक्षा फुल टाईम जॉब करत UPSC परीक्षांची तयारी केली. इतकचं नाही तर ऑल इंडिया रॅकिंगमध्ये ३५ क्रमांक गाठत IAS बनण्यास यशस्वी ठरली आहे.
दुसऱ्याच प्रयत्नात यशस्वी
अपर्णा रमेश(Aparna Ramesh) दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. याआधी तिने २०१९ ची परीक्षा दिली होती. परंतु प्रीलिम्समध्ये तिला यश मिळवता आलं नाही. त्यानंतर दुसऱ्यांचा परीक्षा देण्याचा निर्णय अपर्णाने घेतला. आणि दुसऱ्या प्रयत्नात घेतलेल्या मेहनतीचं फळ मिळालं. अपर्णा रमेश हिचं IAS बनण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानं कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय अपर्णा रमेशने सांगितले की, फुल टाइम जॉब करत UPSC परीक्षांची तयारी करणं सोपं नाही. त्यासाठी वेळेचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान होतं. कारण नोकरीनंतर खूप कमी वेळ मला परीक्षांच्या तयारीसाठी मिळत होता. स्वत:ला दुसरीकडे विचलित न करता केवळ फोकस परीक्षांवर ठेवला. जास्तीत जास्त वेळ अभ्यास करणं आणि नोट्स तयार करणं हेच करत होती. तसेच परीक्षांनंतर मुलाखतीचीही तयारी अपर्णाने केली होती.
कसं केलं वेळेचं नियोजन?
अपर्णा रमेशनं फुल टाइम जॉबसोबत परीक्षांच्या तयारीसाठी सकाळी वेळ काढला. प्रत्येक दिवशी पहाटे ४ ते ७ वाजेपर्यंत तिने अभ्यास केला. त्यानंतर ऑफिसला जायची तयारी करायची. संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये काम करायचे. ऑफिसमधून घरी आल्यानंतर २-३ तास अभ्यास करायचा. तसेच सुट्टीच्या दिवशी कमीत कमी ८ ते १० तास अभ्यास करायचा असा अपर्णाचा दिनक्रम होता. परीक्षेच्या तयारीसाठी नोकरी सोडण्याला अर्थ नव्हता. त्यासाठी दोन्ही संतुलन राखलं. हा माझा निर्णय होता. मी ज्या विषयांवर लक्ष केंद्रीत केले त्यावर मन लावून अभ्यास केला असं ती म्हणाली. नागरी सुविधा परीक्षा २०२० मध्ये अपर्णाला १००४ गुण मिळाले. ज्यात लेखी परीक्षेत ८२५ गुण तर पर्सनॅलिटी चाचणीत १७१ गुण मिळवत परीक्षेत ३५ वा क्रमांक पटकवला.