एका भविष्यवाणीनं बदललं संपूर्ण आयुष्य, दिवसाला कमावतो ३२ लाख; कोण आहे पुनीत गुप्ता?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 09:50 AM2021-12-13T09:50:09+5:302021-12-13T09:50:27+5:30
पुनीत गुप्ता मुंबईच्या एका बँकेसोबत काम करत होता. एकदा आयटी कंपनी सुरु करण्यासाठी त्याने नोकरी सोडण्याचा विचार केला.
भविष्यात काय होईल, कधी होईल याचा विचार करणं हे आपल्याला प्रत्येक वेळी सतर्क राहण्यासाठी मदत करते. आजच्या दिवसाचा आनंद लुटा ही म्हण फायदेशीर ठरत नाही. आपल्याला जितकं हवं असतं तितकं जीवनात कधीही मिळत नाही. परंतु एक App असाही आहे जो आपल्या भविष्याशी निगडीत प्रश्नांना उत्तरं देऊन पुढील मार्ग निवडण्यासाठी मदत करतो तो म्हणजे Astro Talk
तुम्ही कधी या App वर ज्योतिषाबाबत ऐकलं का? हा अनोखा स्टार्टअप आहे. जो दिवसरात्र ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी ज्योतिषांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणतं. परंतु एस्ट्रोटॉकची विशेष बाब म्हणजे त्याचे संस्थापक पुनीत गुप्ता ज्योतिषावर विश्वास ठेवला नाही आणि एका ज्योतिषाच्या भविष्यवाणीनं त्यांचे जीवन कायमचं बदलून टाकलं. नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेऊया.
पुनीत गुप्ता मुंबईच्या एका बँकेसोबत काम करत होता. एकदा आयटी कंपनी सुरु करण्यासाठी त्याने नोकरी सोडण्याचा विचार केला. २०१५ मध्ये स्टार्टअप करण्याआधी नोकरी सोडण्यापूर्वी पुनीतनं प्रयत्न केला होता. परंतु त्याला नुकसान सहन करावं लागलं आणि पुन्हा तो नोकरी करु लागला. त्याच्यासाठी पुन्हा नोकरी करणं सोप्पं नव्हतं. सुदैवाने एकेदिवशी त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्याने पुनीतला विचारलं की, तू चिंतेत का आहे? तेव्हा त्याने राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु हिंमत होत नसल्याचं सांगितले. हा सहकारी ज्योतिष अभ्यास करत होता. ज्योतिषाच्या माध्यमातून त्याने पुनीतची मदत करण्याचा प्रयत्न केला.
पुनीतचा ज्योतिषावर विश्वास नव्हता. त्यामुळे त्याने वरिष्ठ सहकाऱ्याचं मनावर न घेता त्यांचे बोलणं नाकारलं. सहकारी त्याची मदत करण्यासाठी खूप आग्रही होती. आणि तिला स्वत:ला सिद्ध करायचं होतं. त्यासाठी तिने पुनीतला मान्य करायला लावलं. या सहकाऱ्याने भविष्यवाणी केली होती की, पुनीत नोकरीचा राजीनामा देईल. २०१५ ते २०१७ हा काळ त्याच्यासाठी खूप फायद्याचा ठरेल परंतु एप्रिल २०१७ नंतर त्याचा स्टार्टअप बंद पडेल कारण त्याचा स्टार्टअपमधील सहकारी त्याची साथ सोडेल. पुनीतला चिंता करण्याची गरज नाही. कारण २०१७-१८ मध्ये तो पुन्हा काहीतरी करेल आणि यशस्वी होईल.
पुनीतला भविष्यवाणीवर विश्वास नव्हता परंतु सहकाऱ्याचे बोलणं ऐकून त्याला सकारात्मक वाटलं. त्यानंतर त्याने राजीनामा दिला. नवीन स्टार्टअपमध्ये त्याला चांगले यश मिळाले. भविष्यवाणीनुसार त्याचा सहकारी २०१७ मध्ये सोडून गेला त्यामुळे व्यवसायात त्याला नुकसान सहन करावं लागलं. २ वर्षापूर्वी पुनीतला सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरली. त्यावेळी पुनीतने सहकाऱ्याला फोन करुन हे मान्य केले. तेव्हा पुनीतच्या डोक्यात एक विचार आला की असा App सुरु करावा तेव्हा सहकाऱ्याने २०१८ मध्ये याची सुरुवात होईल आणि २०२६ पर्यंत ते वेगाने वाढेल असं सांगितले.
AstroTalk ची निर्मिती
लॉन्चनंतर अवघ्या ४ वर्षाच्या काळात एस्टोटॉकने लोकांसोबत ज्योतिषांना बोलण्याची संधी देण्याचं माध्यम बदललं. केवळ ४ वर्षात २ कोटीहून अधिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल आणण्याची संधी आम्हाला मिळाली. त्याबद्दल अभिमान आणि गर्व वाटतो असं पुनीत म्हणाला. या App मध्ये त्याच ज्योतिषांचा समावेश करण्यात आला आहे. जे निकट भविष्यवाणी करतील आणि लोकांच्या वैयक्तिक समस्यांचे निरसन करण्यासाठी तत्पर असतील. बाजारात स्वयंघोषी ज्योतिषी खूप आहेत.मात्र त्यातील केवळ ५ टक्केच पात्र ठरतात. एस्ट्रोटॉक भारतात सर्वात वेगाने वाढणारा स्टार्टअप आहे. पुनीत गुप्ता सांगतो की, आम्ही दरदिवशी ३२ लाख रुपयांहून अधिक व्यवसाय करतो. सध्या App पॅनेलमध्ये १५०० ज्योतिषी आहेत. जे कॉल आणि चॅटच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात.