Inspirational Story: दहावीतही अन् बारावतही नापास! पण जिद्धीसमोर अपयश ठरले खुजे, झाल्या २२ व्या वर्षी IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 01:51 PM2022-03-24T13:51:59+5:302022-03-24T13:55:01+5:30

अंजू शर्मा यांचा यूपीएससी उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण आणि परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी आहे.

success story of IAS Anju Sharma failed in 10th and 12th but became IAS at age of 22 | Inspirational Story: दहावीतही अन् बारावतही नापास! पण जिद्धीसमोर अपयश ठरले खुजे, झाल्या २२ व्या वर्षी IAS

Inspirational Story: दहावीतही अन् बारावतही नापास! पण जिद्धीसमोर अपयश ठरले खुजे, झाल्या २२ व्या वर्षी IAS

googlenewsNext

कठोर मेहनत, सातत्यानं प्रयत्न आणि अभ्यासाच्या जोरावर कोणत्याही कामात यश नक्की मिळतं. अत्यंत कठीण समजली जाणारी यूपीएससीची परीक्षादेखील (UPSC Exam) याला अपवाद नाही. यूपीएससीची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एका लढाईसारखी मानली जाते. छोटीशी चूकदेखील विद्यार्थ्याची संधी हिरावून घेऊ शकते. अनेकदा नशीब, श्रम आणि संधी या गोष्टींनी साथ दिली, तरी अनेकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळतं असं नाही; पण वारंवार प्रयत्न केल्यास यश  (Success Story) नक्कीच मिळतं. केवळ अव्वल विद्यार्थीच या परीक्षेत यश मिळवू शकतात, असा आपल्याकडे समज आहे; मात्र वयाच्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अंजू शर्मा (Anju Sharma) यांनी हा समज पूर्णतः खोटा ठरवला आहे. अंजू शर्मा यांचा यूपीएससी उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण आणि परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी आहे. त्याविषयीचं वृत्त 'नवभारत टाइम्स'ने दिलं आहे.

अंजू शर्मा यांनी जयपूरमधून बी. एस्सी. आणि एमबीए पूर्ण केलं. टॉपर म्हणून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी १९९१ साली राजकोट येथून असिस्टंट कलेक्टर (Assistant Collector) म्हणून करिअरला सुरुवात केली. सध्या अंजू गांधीनगर सचिवालयातल्या शासकीय शिक्षण विभागाच्या (उच्च व तंत्रशिक्षण) प्रधान सचिव (Principal Secretary) आहेत.

जीवनात हे यश मिळण्यासाठी दोन घटना कारणीभूत ठरल्याचं अंजू आवर्जून नमूद करतात. आयुष्यात पुढे यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या अंजू इयत्ता १२ वीच्या परीक्षेत अर्थशास्त्र (Economics) या विषयात नापास (Fail) झाल्या होत्या. तसंच इयत्ता १० वीच्या रसायनशास्त्र या विषयाच्या प्रीबोर्ड परीक्षेत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे अर्थशास्त्रात नापास झालेल्या अंजू यांना अन्य विषयांत डिस्टिंक्शन (Distinction) मिळालं होतं. `या दोन्ही घटनांमुळे माझ्या जीवनाची दिशा बदलली. अपयश माणसाला मोठ्या यशासाठी तयार करतं,` असं अंजू सांगतात.

अंजू शर्मा यांनी सांगितलं, `कठीण प्रसंगात पालक आपल्या मुलांना कधीही एकटं सोडत नाहीत. माझी आई माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिली. कठीण प्रसंगी माझ्या आईनं मला धीर आणि प्रेरणा दिली. शेवटच्या क्षणी अभ्यासावर अवलंबून राहू नये, हा धडा मी अपयशातून घेतला. नापास होण्याचा अनुभव गाठीशी असल्यानं मी सुरुवातीपासूनच महाविद्यालयीन परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मला महाविद्यालयात सुवर्णपदक (Gold Medal) मिळालं. हेच धोरण मला पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उपयोगी पडलं.` अंजू यांनी वेळेपूर्वीच अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पहिल्याच प्रयत्नात त्या आयएएस टॉपर्सच्या यादीत समाविष्ट झाल्या.

एका प्रमुख दैनिकाशी बोलताना अंजू शर्मा यांनी सांगितलं, `प्री-बोर्ड परीक्षेदरम्यान माझा बराच अभ्यास बाकी होता. रात्रीचं जेवण झाल्यावर परीक्षेसाठी आपली पूर्ण तयारी झाली नसल्याने आपण नापास होणार, याची जाणीव झाल्याने मी घाबरून गेले होते. माझ्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती मला इयत्ता १०वीतली कामगिरी किती महत्त्वाची आहे, त्यावरून उच्च शिक्षणाची दिशा कशी ठरते, हे सांगत होती. त्यामुळे मी अधिकच घाबरून गेले होते; पण मला माझ्या आईने धीर दिला. पालकांच्या पाठिंब्यामुळे मी यशस्वी झाले,` असं अंजू सांगतात.

Web Title: success story of IAS Anju Sharma failed in 10th and 12th but became IAS at age of 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.