"इतक्या रात्री कोण कोचिंग घेते..."; पहिल्याच प्रयत्नात 'ती'ने पटकावलं घवघवीत यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 08:24 AM2023-05-08T08:24:09+5:302023-05-08T08:25:00+5:30
शशिचे आजोबा शेतकरी होते. वडील सैन्यात असल्याने विविध ठिकाणी पोस्टिंग व्हायची त्यामुळे शशिला अनेकदा शाळा बदलाव्या लागल्या.
नवी दिल्ली - शशिकला वर्मा(Shashikala Verma) उत्तर प्रदेशातील सरकारमधील एक अधिकारी ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPPCS परीक्षेत यश संपादन केले. एकेकाळी अत्यंत कमी आत्मविश्वास असणारी शशिकला जी लोकांसमोर बोलताना घाबरायची. कुटुंबाशी बोलतानाही कमी बोलायची. शशिकला यांचे वडील सैन्यात होते. मुलीची ही कमतरता वडिलांनी ओळखली. त्यानंतर शशिला असं ट्रेनिंग दिले ज्याने मुलाखत घेणाऱ्या आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही हैराण केले.
शशिकला यांनी सिव्हिल परीक्षा देण्याच्या दिशेने पाऊल टाकले तेव्हा केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबीयांनाही खूप टोमणे सहन करावे लागले. काहींनी तर इतक्या रात्री कोण कोचिंग घेते असं बोलत होते. शशिने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. ती तिच्या मार्गावर चालत राहिली आणि पहिल्याच प्रयत्नात तिने UPPCS परीक्षेत यश मिळवले. शशिकला बलिया जिल्ह्यातील असनवार गावातील रहिवासी आहे. सध्या ती उत्तर प्रदेश सरकारमध्ये अर्थ खात्यात अधिकारीपदावर कार्यरत आहे.
शशिचे आजोबा शेतकरी होते. वडील सैन्यात असल्याने विविध ठिकाणी पोस्टिंग व्हायची त्यामुळे शशिला अनेकदा शाळा बदलाव्या लागल्या. आर्मी शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. ती अभ्यासात हुशार होती परंतु बोलण्यात कमी पडायची. शिक्षकांकडून ही बाब वडिलांना कळाली. वडिलांनी ते गांभीर्याने घेतले. त्यानंतर वडिलांनी शशिला NCC कॅडरमध्ये टाकले. तिथे शशि यांच्यात लीडरशिप क्वालिटी आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
त्यानंतर पहिल्यांदा शशिकला यांनी यूपीपीसीएसचा अभ्यासक्रम सुरू केला. प्री मेन्स, मग मुलाखत पाहून ती घाबरली. मात्र तिने हे पूर्ण करण्याची जिद्द ठरवली. तिने तयारी सुरू केली. तिने वडिलांना सांगून कोचिंग क्लास लावला. जर ती योग्य दिशेने गेली तर अशक्य काहीच नाही असं शिक्षकाने मंत्र दिला. या काळात शशिकला आणि तिच्या कुटुंबाला अनेकांने टोमणे मारले. मुलगी ३० वर्षाची झाली, लग्न करायचे नाही. इतक्या रात्री कोण कोचिंग घेते इतकेही बोलले. मात्र याकडे शशि आणि कुटुंबाने दुर्लक्ष केले. त्यानंतर शशिने पहिल्याच प्रयत्नात यूपीपीसीएस परीक्षा उत्तीर्ण करत अनेकांची बोलती बंद केली.