Afghanistan crisis : विमानतळावर शहीद सैनिकांचे पार्थिव पाहून राष्ट्राध्यक्ष जो बायडन भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 04:06 PM2021-08-30T16:06:27+5:302021-08-30T16:07:26+5:30

अफगाणिस्तानहून अमेरिकेतील डेलावेयर येथे रविवारी 13 सैनिकांचे पार्थिव आणण्यात आले. सैन्य दलाचे सन्मानपूर्ण प्रोटॉकॉलनुसार त्यांचे पार्थिव येथे आले. त्यावेळी, राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि प्रथम महिला जिल बायडन हेही हजर होते.

Afghanistan crisis : President joe Biden arrives at the airport to pick up the bodies of the martyred soldiers in afghanistan | Afghanistan crisis : विमानतळावर शहीद सैनिकांचे पार्थिव पाहून राष्ट्राध्यक्ष जो बायडन भावूक

Afghanistan crisis : विमानतळावर शहीद सैनिकांचे पार्थिव पाहून राष्ट्राध्यक्ष जो बायडन भावूक

Next
ठळक मुद्देअफगाणिस्तानमध्ये शहीद झालेल्या 13 सैनिकांमध्ये 11 सैनिक मरीन दलाचे आहेत. तर, एक नेव्ही मेडीकल पर्सनल आणि एक सहयोगी सैनिक आहे. गुरुवारी काबुल विमानतळावर झालेल्या फियादीन हल्ल्यात या जवानांना वीरमरण आले.

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर काबुलमध्ये अचानक बॉम्बस्फोट होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा काबूल विमानतळाजवळ रॉकेट्सचा आवाज ऐकू आला आहे. तालिबान आणि अमेरिकेतील संघर्ष आणखी चिघळला आहे. काबुलमध्ये गेल्या आठवड्यात फियादीन येथील हल्ल्यात अमेरिकेचे 13 सैनिक शहीद झाले. या सैन्यांचे पार्थिव स्विकारण्यासाठी स्वत: राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी विमानतळावर हजेरी लावली. 

अफगाणिस्तानहून अमेरिकेतील डेलावेयर येथे रविवारी 13 सैनिकांचे पार्थिव आणण्यात आले. सैन्य दलाचे सन्मानपूर्ण प्रोटॉकॉलनुसार त्यांचे पार्थिव येथे आले. त्यावेळी, राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि प्रथम महिला जिल बायडन हेही हजर होते. विमानतळावर संरक्षण सचिव लॉयड ऑस्टीन यांच्यासह बडे अधिकारीही हजर होते. डेलोवेयर विमानतळावर पोहचण्यापूर्वी फर्स्ट लेडी जिल यांनी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी, कुटुंबीयांचे सांत्वन केले. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे, असेही बायडन यांनी म्हटले. आपल्या देशाच्या सैनिकांचे पार्थिव राष्ट्रीय ध्वजात लिपटलेले पाहून जो बायडन भावूक झाले होते. त्यांनी आपलं डोकं शहीद सैनिकांच्या सन्मानार्थ झुकवल्याचं दिसून आलं.

11 सैनिक मरीन 

अफगाणिस्तानमध्ये शहीद झालेल्या 13 सैनिकांमध्ये 11 सैनिक मरीन दलाचे आहेत. तर, एक नेव्ही मेडीकल पर्सनल आणि एक सहयोगी सैनिक आहे. गुरुवारी काबुल विमानतळावर झालेल्या फियादीन हल्ल्यात या जवानांना वीरमरण आले. या दुर्घटनेत एकूण 174 जणांचा मृत्यू झाला आहे. एका माहितीनुसार अद्यापही काबुलमध्ये 2500 अमेरिकन नागरिक अडकले आहेत. तर, काही सैनिकही असून या सर्वांना 31 ऑगस्टपर्यंत काबुल सोडावे लागणार आहे. आता, अफगाणिस्तानमध्ये एकही स्वेच्छादूत राहिला नाही. 

पुन्हा रॉकेट हल्ला झाल्याची शक्यता

वृत्तसंस्था एएफपीने सोमवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर अनेक रॉकेट्स उडताना ऐकू आल्याचा दावा करत आपल्या कर्मचाऱ्यांचा हवाला दिला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मिसाइल डिफेंसिव सिस्टम अॅक्टिव्ह झाल्याचे आवाज ऐकले. विमानतळाजवळ धूर दिसून आला, असे काबूल विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांनी सांगितले. तर इंटरसेप्टर्सनी रॉकेट्स खाली पाडल्याचे समजते.
 

Web Title: Afghanistan crisis : President joe Biden arrives at the airport to pick up the bodies of the martyred soldiers in afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.