Afghanistan Taliban Crisis : अमरुल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानाचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वत:च्या नावाची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 10:08 PM2021-08-17T22:08:53+5:302021-08-17T22:09:59+5:30
Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तान व्हिएतनाम नाही हे आपल्याला सिद्ध करायला हवं, सालेह यांचं वक्तव्य.
तालिबाननंअफगाणिस्तानवर रविवारी ताबा मिळवला होता. त्यानंतर अफगाणिस्तानचेराष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता अफगाणिस्तानचे उप-राष्ट्राध्यक्ष अमरूल्लाह सालेह यांनी स्वत:च्या नावाची घोषणा अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून केली.
मंगळवारी अमरूल्लाह सालेह यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील घोषणा केली. "अफगाणिस्तानच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षांची अनुपस्थितीती, पलायन, राजीनामा किंवा मृत्यू अशा परिस्थितीत उप राष्ट्राध्यक्ष हे काळजीवाहू राष्ट्राध्यकांचा पदभार स्वीकारू शकतात. या वेळी मी आपल्या देशात आणि वैध काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहे. मी सर्व नेत्यांच्या समर्थनासाठी आमि त्यांच्या सहमतीसाठी संपर्क साधत आहे," असंही अमरूल्लाह सालेह म्हणाले.
#Afghanistan's First Vice President Amrullah Saleh declares himself caretaker president of the country; says he is "reaching out to all leaders to secure their support & consensus" pic.twitter.com/SUG3e7vLCL
— ANI (@ANI) August 17, 2021
या ट्वीटपूर्वीही सालेह यांनी एक ट्वीट केलं होतं. यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी अफगाणिस्तानवर चर्चा करणं व्यर्थ असल्याचं म्हटलं होतं. आम्हा अफगाण लोकांना अफगाणिस्तान हे व्हिएतनाम नसल्याचं सिद्ध करून द्यायला हवं, असंही ते म्हणाले. आम्ही युएस-नाटोच्या नंतरही आमचं धैर्य गमावलं नाही. आम्ही आमच्या समोर अपार शक्यता पाहत आहोत. विनाकारण होत असलेला विरोध आता संपला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.