मंगळ ग्रहावर पसरली बर्फाची चादर, NASA ने फोटो शेअर करुन दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:11 IST2021-08-03T15:09:26+5:302021-08-03T15:11:22+5:30
NASA news post: NASA ने शेअर केलेल्या फोटोमध्ये मंगळावर बर्फाची चादर दिसत आहे.

मंगळ ग्रहावर पसरली बर्फाची चादर, NASA ने फोटो शेअर करुन दिली माहिती
ठळक मुद्देनासाच्या या पोस्टला आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
सुर्यापासून चार नंबरवर असलेला मंगळ ग्रह(Red Planet)नेहमीच जगभरातील लोकांसाठी/वैज्ञानिकंसाठी कुतूहलाचा विषय असतो. अनेक वर्षांपासून विविध देशातील वैज्ञानिकांच्या संशोधनांतून मंगळ ग्रहाबद्दल अधिकाधिक माहिती मिळत आहे. आता अमेरिकेतील अंतराळ संस्था नासा(NASA)ने मंगळ ग्रहाबद्दल चकीत करणारी माहिती दिली आहे.
नासाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर मंगळाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल, कारण या फोटोमध्ये मंगळ ग्रहावर बर्फ असल्याचे दिसत आहे. हे फोटोज नासाच्या मंगळ टोही ऑर्बिटरने घेतल्याची माहिती नासाने फोटो कॅप्शनमध्ये दिली.
या पोस्टला आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून, ही संख्या वाढत आहे. युझर नासाच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका इंस्टाग्राम युझरने कमेंट केली, "भव्य." दुसऱ्या एका युझरने कमेंट केली, "हे एक महाकाव्य आहे." अनेकजण आपली प्रतिक्रिया देण्यासाठी ह्रदयाची इमोजीदेखील शेअर करत आहेत.