कमांडेंट मुलीला इन्स्पेक्टर वडिलांनी केला सॅल्युट; म्हणाली, "बाबाच माझे रोल मॉडेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 03:51 PM2021-08-09T15:51:51+5:302021-08-09T15:57:25+5:30
Inspiration Story : ज्या विभागात वडील इन्स्पेक्टर पदावर तैनात आहेत, त्याच विभागात त्यांची मुलगी असिस्टंड कमांडेंट पदावर तैनात आहे. सोशल मीडियावर वडिलांनी सॅल्युट केल्याचा भावूक क्षण झाला व्हायरल.
आपल्या मुलानं यशाचं शिखर गाठणं हे कोणत्याही आई-वडिलांची मनापासून इच्छा असते. आपल्या मुलांनी यशाचं शिखर गाठलं म्हणजे जगातील कोणतीही लढाई आपण जिंकलो असं आई-वडिलांना वाटत असतं. असाच एक भावूक क्षण मसुरीमध्ये पाहायला मिळाला. ज्या विभागात वडील इन्स्पेक्टर म्हणून तैनात आहेत, त्याच विभागात मुलगी असिस्टंट कमांडेंट पदावर नियुक्त झाली आहे. अशातच वडिलांनी पासिंग परेडमध्ये आपल्या मुलीला सॅल्युट केलं. सोशल मीडियावर हा भावूक करणारा क्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यापेक्षा कोणतीही अभिमानाची बाब असू शकत नाही असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
फोटोंमध्ये जे सॅल्युट करताना दिसत आहेत, त्यांचं नाव कमलेश कुमार असं आहे. ते आयटीबीपीमध्ये इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आ हे. तर त्यांच्या मुलीचं नाव दीक्षा असं आहे. दीक्षाच्या बालपणापासून तिनं आयटीबीपीमध्ये यावं असं कमलेश कुमार यांना वाटत होतं. त्यांचं स्वप्न दीक्षानं पूर्ण केलं.
Uttarakhand | In a first, two women have joined the Indo Tibetan Border Police Force (ITBP) as combatised officers.
— ANI (@ANI) August 8, 2021
The passing-out parade held at the ITBP Academy in Musoorie today. Parade was reviewed by Uttarakhand Chief Minister, Pushkar Singh Dhami. pic.twitter.com/1pZ0IDLGh5
"My father is my role model, he always motivated me," says Officer Diksha, daughter of an Inspector serving with the ITBP pic.twitter.com/cRUFnrhCsc
— ANI (@ANI) August 8, 2021
त्यांचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकांच्या कमेंट्स येऊ लागल्या. एएनआय या वृत्तसंस्थेनंही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंसोबत काही माहितीही दिली. "वडिलांनी कायमच ITBP मध्ये जॉईन होण्यास प्रोत्साहन दिलं. त्यांनी प्रत्येक हवी ती गोष्ट उपलब्ध करून दिली. ज्यांना आव्हानं स्वीकारण्यास आवडतात अशा महिलांसाठी आयटीबीपी ही एक चांगली फोर्स आहे. त्यांनी ही फोर्स नक्की जॉईन करावी. आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत," असं दीक्षानं सांगितलं. दीक्षाच्या व्यतिरिक्त प्रकृती हीची निवडदेखील आयटीबीपीच्या असिस्टेंट कमांडर पदासाठी झाली.