अमेरिकेत कोरोनाबरोबरच आणखी एक मोठं संकट! असाध्य Candida Auris मुळे पसरली दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 05:44 PM2021-07-24T17:44:50+5:302021-07-24T17:47:38+5:30

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार (सीडीसी) घातक कँडिडा ऑरिस संक्रमण झालेल्या तीनपैकी एका रुग्णाचा मृत्यू होतो.

US Incurable candida auris new trouble in America | अमेरिकेत कोरोनाबरोबरच आणखी एक मोठं संकट! असाध्य Candida Auris मुळे पसरली दहशत

अमेरिकेत कोरोनाबरोबरच आणखी एक मोठं संकट! असाध्य Candida Auris मुळे पसरली दहशत

Next

वॉशिंग्टन - कोरोनाबरोबरच आणखीही काही नव्या आजारांनी जगात दहशत निर्माण केली आहे. आता अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी  डलास भागातील दोन रुग्णालये आणि वॉशिंग्टन डीसी (Washington DC)च्या एका नर्सिंग होममध्ये असाध्य (अनट्रिटेबल) फंगस झालेल्या रुग्णांची माहिती दिली. कँडिडा ऑरिस (Candida Auris), यिस्टचे घातक रूप आहे आणि हे गंभीर मेडिकल प्रॉब्लम असलेल्या नर्सिंग होम आणि रुग्णालयांतील रुग्णांसाठी मोठा धोका आहे. महत्वाचे म्हणजे, हे फंगस रक्तप्रवाहात संक्रमणाचे कारण ठरू शकते. एढेच नाही, तर यामुळे मृत्यूही होऊ शकतो.

सीडीसीचे मेघन रयान यांनी म्हटले आहे, की ते पहिल्यांदाच 'ग्रुप ऑफ रेझिस्टन्स' पहात आहेत, यात रुग्ण एकमेकांपासून संक्रमित होत आहेत. वॉशिंग्टन DC नर्सिंग होममध्ये आढळलेले 101 कँडिडा ऑरिसच्या समूहात तीन रुग्ण असे आहेत, ज्यांच्यावर सर्व तीन प्रकारच्या अँटिफंगल औषधांचा परिणाम झाला नाही. 

CoronaVirus News: ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर नवा धोका; कोरोनामुक्त झालेल्यांसमोर गंभीर संकट

डलास भागातील दोन रुग्णालयांत 22 कँडिडा ऑरिस प्रकरणांचे क्लस्टर रिपोर्ट करण्यात आले आहे. यांतील दोन रुग्ण मल्टीड्रग प्रतिरोधक सापडले. यानंतर सीडीसीने, हे संक्रमण रोग्यापासून रोग्यापर्यंत पसरत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. 

तीनपैकी एका रुग्णाचा होतो मृत्यू -
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार (सीडीसी) घातक कँडिडा ऑरिस संक्रमण झालेल्या तीनपैकी एका रुग्णाचा मृत्यू होतो. एवढेच नाही, तर अमेरिकन आरोग्य एजंन्सीने हा फंगल म्हणजे, जागतीक आरोग्यासाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. या फंगलवर मल्टीड्रग्सचा काहीच उपयोग होत नसल्याने CDC ही चिंतित आहे. म्हणूनच याला असाध्य असल्याचे म्हटले जात आहे. तसेच स्टँडर्ड लॅबोरेटरी पद्धतीचा वापर करून इंफेक्शनची ओळख करण्यातही अडचण येत आहे. तसेच, योग्य ओळख करता आली नाही, तर चुकीचा उपचाह होण्याचाही धोका आहे.

भयंकर, भीषण, भयावह! गेल्या 4 आठवड्यांत जगभरात 75% रुग्णांमध्ये 'डेल्टा व्हेरिएंट'; WHO चा गंभीर इशारा

संक्रमण कसे ओळखाल - 
गंभीर कँडिडा संक्रमण झालेल्या अधिकांश रुग्णांमध्ये आधीपासूनच कुठला ना कुठला आजार असल्याचे आढलून आले आहे. यामुळेच, एखाद्याला कँडिडा ऑरिस संक्रमण आहे की नाही, हे ओळखणे अवघड होते. CDCने दिलेल्या माहितीनुसार, ताप आणि थंडी वाजणे कँडिडा ऑरिस संक्रमणाचे सर्व सामान्य लक्षण आहे आणि संक्रमणासाठी अँटीबायोटिक उपचार करूनही लक्षणांत सुधारणा होत नाही.

Web Title: US Incurable candida auris new trouble in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.