१,९३० मीटर लांबीचा पिझ्झा, अमेरिकेत विक्रम
By admin | Published: June 26, 2017 01:08 AM2017-06-26T01:08:34+5:302017-06-26T01:08:34+5:30
पिझ्झा भाजण्याच्या ओव्हनचे उत्पादन करणाऱ्या एका अमेरिकी कंपनीने १०० शेफच्या मदतीने १,९३० मीटर लांबीचा पिझ्झा तयार
Next
वॉशिंग्टन : पिझ्झा भाजण्याच्या ओव्हनचे उत्पादन करणाऱ्या एका अमेरिकी कंपनीने १०० शेफच्या मदतीने १,९३० मीटर लांबीचा पिझ्झा तयार करून गिनीज बुकात नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. याआधीचा विक्रम पिझ्झाचे जन्मस्थान असलेल्या इटलीत तयार केल्या गेलेल्या १,८५३.८८ मीटर लांबीच्या पिझ्झाचा होता.
या उपक्रमास कॅलिफोर्नियातील अनेकांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. त्यांच्या मदतीने पिझ्झा भाजण्याच्या ओव्हनचे उत्पादन करणारी कंपनीने १,९३०.३९ मीटर लांबीचा पिझ्झा तयार करण्यात यश मिळविले. ३,६३६ किलो गव्हाचे पीठ, १,६३४ किलो चीज आणि २,५४२ किलो सॉसचा वापर करून हा पिझ्झा तयार करण्यात आला.