अमेरिकेतल्या शाळेत विद्यार्थ्यानं केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू, 10 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 03:23 AM2018-05-19T03:23:24+5:302018-05-19T03:23:24+5:30
अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातील एक शाळा गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. एका विद्यार्थ्याने अचानक केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी आहेत.
टेक्सास- अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातील एक शाळा गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. एका विद्यार्थ्याने अचानक केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी आहेत. मृतांमध्ये ब-याच विद्यार्थ्यांचाच समावेश आहे. गोळीबार प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, या दोघांपैकी एकाने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
टेक्सास प्रांतातील ह्युस्टन शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या सांता फे हायस्कूलमध्ये हा गोळीबार झालाय. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत अशा अनेक गोळीबाराच्या घटना घडत आहेत. तसेच सात दिवसांतील शाळांमधील ही तिसरी गोळीबाराची घटना आहे. फेब्रुवारी महिन्यातही फ्लोरिडातल्या पार्कलँड शाळेत अशाच प्रकारे गोळीबार झाला होता. त्यात 17 जणांना स्वतःच्या प्राणांना मुकावे लागले होते. आतापर्यंत अमेरिकेत वर्षभरात 22 वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. तसेच या गोळीबारांच्या घटनांना अमेरिकेतलं गन कल्चर काही प्रमाणात जबाबदार असल्याचीही चर्चा आहे.
Texas Gov. Greg Abbott says 10 people killed, 10 wounded in a shooting at a high school in Santa Fe. https://t.co/bWBzaqjOoe
— The Associated Press (@AP) May 18, 2018