कोलंबियात विमान कोसळून १० ठार
By Admin | Published: September 8, 2014 03:21 AM2014-09-08T03:21:31+5:302014-09-08T03:21:31+5:30
कोलंबियाच्या दक्षिणेकडील अॅमेझॉनच्या जंगलात छोटे विमान कोसळून यातील सर्व १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
बोगोटा : कोलंबियाच्या दक्षिणेकडील अॅमेझॉनच्या जंगलात छोटे विमान कोसळून यातील सर्व १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे. प्युएर्टो सॅन्टँडर शहरापासून १० किलोमीटर अंतरावर या विमानाचे अवशेष आढळल्याचे येथील नागरी उड्डयन संस्थेने सांगितले. विमानात आठ प्रवासी आणि चालक पथकातील दोघांचा समावेश होता. हे विमान फ्लोरेन्सिकाच्या मार्गावर होते. ही दुर्घटना कशामुळे घडली याची कारणमीमांसा ही संस्था करीत आहे. तीन मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटविण्यात येत आहे. पेरु आणि ब्राझीलच्या सीमेलगत ही दुर्घटना घडली.