चिंता वाढली! काबूलमधून बाहेर काढलेल्या 100 अफगाणी नागरिकांचे संशयित दहशतवाद्यांच्या यादीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 17:50 IST2021-08-26T17:46:15+5:302021-08-26T17:50:21+5:30
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून अमेरिकेत नेण्यात आलेल्या नागरिकांपैकी 100 पेक्षा अधिक लोकांची अमेरिकेच्या संशयित दहशतवाद्यांच्या यादीत नावं आहेत.

चिंता वाढली! काबूलमधून बाहेर काढलेल्या 100 अफगाणी नागरिकांचे संशयित दहशतवाद्यांच्या यादीत
वॉशिंग्टन:अफगाणिस्तानवरतालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर तेथील नागरिकांना इतर देशात हलवण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत. अमेरिका आणि भारतासह अनेक देश अफगाणी नागरिकांना आपापल्या देशात आश्रय देत आहेत. त्यासाठी विशेष विमानांची सोय केली जात आहेत. दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितल्यानुसार, अफगाणिस्तानातून अमेरिकेत नेण्यात आलेल्या नागरिकांपैकी 100 पेक्षा अधिक लोकांची अमेरिकेच्या संशयित दहशतवाद्यांच्या यादीत नावं आहेत. याशिवाय, कतरवरुन आलेल्या एका व्यक्तीचा दहशतवादी संघटना ISIS शी संबंध आहे. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्यानं डिफेन्स वनला सांगितल, संरक्षण विभागाच्या स्वयंचलित बायोमेट्रिक ओळख प्रणालीद्वारे अफगाणिस्तानातील लोकांची तपासणी केली जाते. यातील काही लोकांची माहिती गुप्तचर संस्थेच्या वॉच लिस्टमधील डेटाशी जुळताना दिसली.
दरम्यान, सहा हजार अफगाण नागरिकांना या एअरबेसवर नेण्यात आलय. परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने डेलीमेल डॉट कॉमला सांगितलं की, गुप्तचर संस्था, कायदा अंमलबजावणी आणि दहशतवादविरोधी पथक सर्व विशेष व्हिसा अर्जदारांना आणि इतर अफगाणांना अमेरिकेत प्रवेश देण्यापूर्वी स्क्रीनिंग आणि सुरक्षा तपासणी करत आहेत. यात, चेहरा ओळख, आयरिस स्कॅन आणि बोटांच्या ठशासहित बायोमेट्रिक डेटाही गोळा केला जात आहे.