हॉटेलसाठी उत्खननात सापडले १०० मानवी सांगाडे; १,००० वर्षे जुनी दफनभूमी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 10:29 AM2023-07-10T10:29:50+5:302023-07-10T10:30:01+5:30

इंग्लंड - एका धक्कादायक घटनेत ब्रिटनमधील डब्लिन येथे एका नवीन हॉटेलसाठी उत्खननाच्या दरम्यान १,००० वर्षे जुनी दफनभूमी सापडली आणि ...

100 human skeletons found in excavation for hotel; A 1,000-year-old burial site was discovered | हॉटेलसाठी उत्खननात सापडले १०० मानवी सांगाडे; १,००० वर्षे जुनी दफनभूमी सापडली

हॉटेलसाठी उत्खननात सापडले १०० मानवी सांगाडे; १,००० वर्षे जुनी दफनभूमी सापडली

googlenewsNext

इंग्लंड - एका धक्कादायक घटनेत ब्रिटनमधील डब्लिन येथे एका नवीन हॉटेलसाठी उत्खननाच्या दरम्यान १,००० वर्षे जुनी दफनभूमी सापडली आणि मध्ययुगीन काळातील सुमारे १०० मानवी सांगाड्यांचे अवशेष सापडले. तेथेच १२व्या शतकातील सेंट मेरीज ख्रिस्ती मठ एके काळी उभा होता. यापैकी किमान दोन सांगाड्यांचे अवशेष ११ व्या शतकाच्या पूर्वार्धातील आहेत.

बीनचोर कंपनी डब्लिन येथील सदर साईटवर बुलिट डब्लिन हॉटेल बांधत आहे. त्यांनी त्यांच्या आराखड्यानुसार उत्खननाचे आदेश दिले होते. तेथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांचे कार्बन टेडिंग केले असता ते १,००० वर्षे जुने असल्याचे सिद्ध करते. त्यामुळे सेंट मेरीज ख्रिस्ती मठ बांधण्यापूर्वीही या भागात ख्रिश्चन लोकसंख्या अस्तित्वात होती, हे स्पष्ट होते. १६००च्या दशकातील इमारतीचा पायाही या ठिकाणी सापडला, तेथे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात डब्लिनमधील सर्वात मोठी बेकरी असलेली बोलँड बेकरी होती. या व्यतिरिक्त, घरगुती रचना असलेल्या ‘डच बिली’चे तुकडे सापडले आहेत. हे १७०० मध्ये स्थलांतरितांनी बांधले होते.

 

Web Title: 100 human skeletons found in excavation for hotel; A 1,000-year-old burial site was discovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.