तब्बल 100 किलोचं सोन्याचं नाणं चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2017 10:02 PM2017-03-28T22:02:37+5:302017-03-28T22:02:37+5:30
बर्लिनच्या बोड म्यूझियममधून एक महाकाय सोन्याचं नाणं चोरीला
Next
>
ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. 28 - बर्लिनच्या बोड म्यूझियममधून एक महाकाय सोन्याचं नाणं चोरीला गेलं आहे. सोमवारी (दि.27) सकाळी नाणं चोरीला गेल्याचं उघडकीस आलं. जवळपास 6 कोटी रूपये इतकी त्या नाण्याची किंमत सांगितली जात आहे.
कॅनडामधून हे नाणं येथे आणण्यात आलं होतं. जवळपास 100 किलोग्राम इतकं त्याचं वजन होतं. इतकं वजनदार आणि मोठं नाणं चोरांनी कसं चोरलं असेल याबाबत तपास सुरू आहे. हे नाणं बनवण्यासाठी उच्चप्रतीच्या सोन्याचा वापर करण्यात आला होता त्यामुळे नाण्याची किंमत आणखी जास्त असण्याची शक्यता आहे.
या नाण्यावर क्वीन एलिजाबेथचं चित्र आहे, तर एखाद्या कारच्या टायर इतकं हे नाणं मोठं आहे. जगामध्ये अशाप्रकारची केवळ 5 नाणी आहेत. 2010 सालापासून हे नाणं बोड म्यूझियममध्ये ठेवण्यात आलं होतं. 2007 मध्ये रॉयल कॅनेडियन मिंटने हे नाणं जारी केलं होतं. त्यावेळचं सर्वात मोठं सोन्याचं नाणं असल्याचा पुरस्कारही मिळाला होता.