अफगाणिस्तानात हिमस्खलनामुळे 100 जणांचा मृत्यू, भारतातही सतर्कतेचा इशारा

By admin | Published: February 6, 2017 08:25 AM2017-02-06T08:25:52+5:302017-02-06T08:34:50+5:30

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे.

100 people die due to avalanches in Afghanistan, alert alert in India | अफगाणिस्तानात हिमस्खलनामुळे 100 जणांचा मृत्यू, भारतातही सतर्कतेचा इशारा

अफगाणिस्तानात हिमस्खलनामुळे 100 जणांचा मृत्यू, भारतातही सतर्कतेचा इशारा

Next

ऑनलाइन लोकमत

काबूल, दि. 6 -  अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे अफगाणिस्तानात झालेल्या हिमस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे.  नुरिस्तान प्रांतातील एकाच गावातील 50 जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे प्रवक्ते उमर मोहम्मदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 34 पैकी 22 प्रांतात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. हिमस्खलनाच्या घटनेत  परिसरातील लोकांची घरं पूर्णतः उद्घवस्त झाली असून येथील रस्तेही ठप्प पडले आहेत.  जवळपास 168 घरं उद्धवस्त झाली असून 340 गुरे दगावली आहेत. दुर्घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात आले आहे, मात्र बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक ठप्प असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने भारतातही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही क्षेत्रांमध्ये हिमस्खलन होण्याचा इशारा देण्यात आला आहे.  
 
पाकिस्तानात 14 जणांचा मृत्यू 
पाकिस्तानातील चित्राल जिल्ह्यातील दूरदराज परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यानंतर झालेल्या हिमस्खलनाच्या घटनेत पाच इमारती जमीनदोस्त झाल्या. यात जवळपास 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 महिला, 6 लहान मुले आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'डॉन'च्या बातमीनुसार, या क्षेत्रात दोन दिवसांपासून प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
 
भारततही सतर्कतेचा इशारा
हिमस्खलन होण्याची शक्यता असल्याने रविवारी जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा, बांदीपुरा, अनंतनाग, बारामुल्ला, गांदरबल, कुलगाम, बडगाम, पूंछ,  किश्तवाड आणि कारगीर परिसरात येत्या 24 तासांत हिमस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
तर हिमाचल प्रदेशआतील कुल्लू, चांबा, मंडी, शिमला आणि किन्नौर जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून लोकांना हिमस्खलन होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरांवरील साचणारे बर्फ वेळोवेळी साफ केले जावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनाच्या दुर्घटनेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत.
 

Web Title: 100 people die due to avalanches in Afghanistan, alert alert in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.