आश्चर्य!101 वर्षाच्या आजीने दिला 17व्या बाळाला जन्म

By namdeo.kumbhar | Published: August 2, 2017 05:49 PM2017-08-02T17:49:20+5:302017-08-02T18:41:45+5:30

जगातील प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तसेच जबाबदारीची घटना असते.

101-YEAR-OLD WOMAN GIVES BIRTH AFTER SUCCESSFUL OVARY TRANSPLANT | आश्चर्य!101 वर्षाच्या आजीने दिला 17व्या बाळाला जन्म

आश्चर्य!101 वर्षाच्या आजीने दिला 17व्या बाळाला जन्म

Next

नवी दिल्ली, दि. 02 - जगातील प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तसेच जबाबदारीची घटना असते. इटालीमधील एका 101 वर्षाच्या महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्या महिलेचं हे 17 वे आपत्य आहे. आई बनण्यासाठी महिलांना वयात बांधणाऱ्या लोकांना या महिलेनं चुकीचे ठरवले असेच म्हणावं लागेल. तसेच महिलांच्या प्रजननासाठी कोणत्याही वयाचं बंधन नसतं हे दाखवलं आहे.

101 व्या वर्षी बाळाला जन्म देऊन इटालीच्या व्हर्टाडे या महिलेनं जगभरातील विज्ञानला आश्चर्याचा धक्काच दिला आहे. भरपूर लोकांच असे मत असते की महिला ठरावीक काळापर्यंत बाळाला जन्म देऊ शकतात. महिलांच्या वाढत्या वयानुसार त्यांची प्रजनन क्षमताही कमी होते असाही विचार काही लोक करतात. व्हर्टाडेने जन्म दिलेल्या बाळाचे वजन 9 पाऊंड आहे. चिकित्सा जगतात या गोष्टीवर टीका केली जात आहे. वाढत्या वयानुसार महिलांमध्ये शारीरिक कमजोरी वाढतेय, अशा वेळी महिलांचे अंडाशय प्रत्यारोपणासाठी पूर्णपणे तयार नसते. अशावेळी त्या महिलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे काही डॉक्टरांचे मत आहे. तुर्कीतील एका खासगी रुग्णालयात या महिलेचे अंडाशय प्रत्यारोपण झाले. डा.एलेक्जेंड्रो पोपोलिकि यांनी हे प्रत्यारोपण ऑपरेशन केलं आहे. अंडाशय प्रत्यारोपणामुळे इटालीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. युरोपच्या कायद्यानुसार बेकायदेशीर आहे.

आई झालेल्या अनातोलिया व्हर्टाडेलाने आपल्या सतराव्या बाळाचा जन्म म्हणजे देवाचा आशीर्वाद असल्याचे म्हटले आहे. अनातोलिया व्हर्टाडेलाने आपल्या बाळाचे नाव फ्रांसिस्को असं ठेवलं आहे. अनातोलिया व्हर्टाडेलाने सोळा बाळांना जन्म दिल्यानंतर 48 व्या वर्षी कर्करोग झाला होता. त्यामुळे ती स्वत:ला गुन्हेगार मानत होती. पण पुन्हा एकदा आई झाल्यानंतर ती आनंदात आहे.

Web Title: 101-YEAR-OLD WOMAN GIVES BIRTH AFTER SUCCESSFUL OVARY TRANSPLANT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.