तुर्कीत १०३ बंडखोर सेनाधिकारी अटकेत
By Admin | Published: July 19, 2016 05:56 AM2016-07-19T05:56:44+5:302016-07-19T05:56:44+5:30
सरकार उलथून टाकण्यासाठी शुक्रवारच्या अपयशी क्रांतिकारक उठावानंतर सरकारने अॅडमिरल्स आणि जनरल्स मिळून १०३ जणांना ताब्यात घेतले.
इस्तंबूल : तुर्कीचे अध्यक्ष रिसीप तय्यीप इर्डोगॅन यांचे सरकार उलथून टाकण्यासाठी शुक्रवारच्या अपयशी क्रांतिकारक उठावानंतर सरकारने अॅडमिरल्स आणि जनरल्स मिळून १०३ जणांना ताब्यात घेतले. याशिवाय बंड प्रकरणात नऊ हजार अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. त्यात मोठ्या संख्येने पोलीस अधिकारीही आहेत. यात ७,८९९ पोलीस, एक प्रांतीय गव्हर्नर, २९ शहरांचे गव्हर्नरांचा समावेश आहे.
सरकारी वृत्तसंस्था ‘अनादोलू’च्या माहितीनुसार, देशभर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई म्हणजे सशस्त्र दलांचे मोठे शुद्धीकरण मानले जात आहे. (वृत्तसंस्था)