स्पायडर मॅन बनून करत होता लहान मुलांचं शोषण, कोर्टाने ठोठावली १०५ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 01:29 PM2018-04-20T13:29:31+5:302018-04-20T13:29:31+5:30

अमेरिकामध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

105 years of education was sentenced by the court, exploiting small children was becoming a spider man | स्पायडर मॅन बनून करत होता लहान मुलांचं शोषण, कोर्टाने ठोठावली १०५ वर्षांची शिक्षा

स्पायडर मॅन बनून करत होता लहान मुलांचं शोषण, कोर्टाने ठोठावली १०५ वर्षांची शिक्षा

googlenewsNext

वॉशिंग्टन - अमेरिकामध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. लहान मुलांसोबत लैगिंग अत्याचार करणे आणि त्याचे व्हिडीओ बनवून पॉर्न साईटला विकत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अमेरिकामधील नॅशव्हिलेमध्ये ही घटना घडली असून जराट टर्नर असे आरोपीचे नाव आहे. 

आरोपी जराट टर्नर रुग्णालयात साफसफाईचे काम करत होता. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, स्पायडर मॅनचे रुप घेऊन मुलांसोबत अश्लिल चाळे करत असे आणि त्याचे व्हिडीओ बनवून पॉर्नसाईडला विकत असल्याच्या आरोपात तो दोषी ठरला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, जराट टर्नर स्पायडर मॅन बनून लहान मुलांसोबत अश्लिल व्हिडीओ तयार करत असे. त्यानंतर ते व्हिडीओ ऑनलाईन विकत होता. कोर्टाने या प्रकरणात त्याला दोषी ठरवत 105 वर्षाचा तुरुंगवासाची सजा सुनावली आहे. 105 वर्षांच्या तुरुगंवासासह पीडित मुलांना 31 हजर डॉलर म्हणजे 20 लाख रुपयाचा जुर्माना देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. 

स्पायडर मॅनची कपडे घालून रुग्णालयाची सफाई केल्यामुळं 2014 मध्ये जराट टर्नर प्रथमच प्रकाशझोतात आला होता. 

Web Title: 105 years of education was sentenced by the court, exploiting small children was becoming a spider man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.