106 वर्षे टिकला फ्रुटकेक....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 03:15 PM2017-08-12T15:15:29+5:302017-08-12T15:47:12+5:30

1911 साली रॉबर्ट फाल्कन स्कॉट यांची मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हा फ्रुटकेक आणला असावा असा अंदाज आहे.

106 years of fruitcake survived .... | 106 वर्षे टिकला फ्रुटकेक....

106 वर्षे टिकला फ्रुटकेक....

Next
ठळक मुद्देया केकबरोबर केप आदारे हटस जवळ अनेक वस्तू सापडल्या आहेत. हंटले अॅंड पामर्सच्या कागदात गुंडाळलेल्या केकबरोबर इतर 1500 वस्तू मिळवणे या ट्रस्टला शक्य झाले आहे.

ख्राइस्टचर्च, दि.12- दोन दिवस जूना पावही किंवा कालची भाकरीही आजकाल दुसऱ्या दिवशी खाल्ली जात नाही. अशा स्थितीत तुमच्या समोर 106 वर्षे जुना पदार्थ समोर ठेवलात तर तुम्ही तो खाल का? पण अंटारर्क्टिकावर संशोधकांना 106 वर्षे जुना केक सापडला आहे. नीट जपून ठेवल्यामुळे हा फ्रुटकेक खाण्यायोग्यही असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. त्याचं झालं असं, अंटार्क्टिका हेरिटेज ट्रस्टचे संशोधक तिकडे भटकंती करत असताना त्यांना केप अदारे हट येथे एक व्यवस्थित टिकवून ठेवलेला फ्रुटकेक दिसला. ही जागा 1899 साली तयार करण्यात आली होती आणि 1911 साली रॉबर्ट फाल्कन स्कॉट यांची मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हा फ्रुटकेक आणला असावा असा अंदाज आहे.
या केकवर गुंडाळलेल्या कागदावर अजूनही हंटले अॅंड पामर्स कंपनीची चिन्हे असल्याचे ट्रस्टच्या व्यवस्थापक लिझी मिक यांनी सांगितले. तो केक अजूनही केक नवाच दिसतो. थोडासा तुपाचा ओशट वास सोडला तर तो एकदम सुंदर दिसतो असे मिक यांनी मत व्यक्त केले आहे. तो केक खाण्यायोग्य वाटत असला तरी संशोधकांना तो खाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. ज्या डब्यात हा केक होता त्याला आजिबात धक्का लागलेला नव्हता, अतिशय थंड तापमानामुळे तो टिकून राहिला असे मिक यांनी सांगितले.

या केकबरोबर केप आदारे हटस जवळ अनेक वस्तू सापडल्या आहेत. हंटले अॅंड पामर्सच्या कागदात गुंडाळलेल्या केकबरोबर इतर 1500 वस्तू मिळवणे या ट्रस्टला शक्य झाले आहे. या संशोधकांना तेथे मोहीमेत लागणारी अनेक साधनं, हत्यारं, कपडे, सार्डिन मासे, जॅम आणि सडलेले मटण सापडले आहे. संशोधनाची ही सगळी मोहीम 14 महिने चाललल्याचे ट्रस्टने सांगितले आहे. केक आणि इतर वस्तू पुन्हा त्याच जागी ठेवण्यात येणार आहेत. थंड तापमानामुळे हा केक आणखी काही वर्षे टिकू शकेल असे मत मिक यांनी व्यक्त केले आहे.

(रॉबर्ट फाल्कन स्कॉट या अंटार्क्टिका मोहिमेत सामिल झालेल्या संशोधकांच्या पार्टीमधला हा केक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.)

रॉबर्ट फाल्कन स्कॉट कोण होते?
रॉबर्ट फाल्कन स्कॉट रॉबर्ट हे ब्रिटिश नौदलातील अधिकारी होते. 6 जून 1868 साली त्यांचा इंग्लंडमधील डेवॉन येथे जन्म झाला. अंटार्क्टिकावर 1901 ते 1904 या काळात त्यांनी डिस्कव्हरी ही मोहीम पूर्ण केली तर 1910 मध्ये त्यांनी टेरा नोव्हा मोहिमेत सहभाग घेतला. पहिल्या डिस्कव्हरी मोहिमेनंतर इंग्लंडमध्ये ते चांगलेच लोकप्रिय झाले. मात्र दुसऱ्या मोहिमेमध्ये दक्षिण ध्रुवाजवळ आल्यानंतर हिमदंशामुळे त्यांचा मृत्यू झाला. फ्रॅास्ट आणि त्यांच्या दोन सहकार्यांचे मृतदेह आठ महिन्यांनी शोधण्यात आले होते. 1948 साली त्यांच्यावर स्कॉट ऑफ द अंटार्क्टिक नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. हा चित्रपट त्यांच्या टेरा नोव्हा मोहिमेवर आधारित आहे.

Web Title: 106 years of fruitcake survived ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.