108 फूट उंची, 70 हजार sqft परिसरा अन् 700 कोटी खर्च; UAE मध्ये पहिले हिंदू मंदिर तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 03:26 PM2023-12-10T15:26:41+5:302023-12-10T15:28:04+5:30

2015 पासून या मंदिराचे काम सुरू झाले होते. फेब्रुवारी महिन्यात PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन.

108 feet height, 70 thousand sqft area; First Hindu temple built in UAE , pm-modi-will-inaugurate-in-february | 108 फूट उंची, 70 हजार sqft परिसरा अन् 700 कोटी खर्च; UAE मध्ये पहिले हिंदू मंदिर तयार

108 फूट उंची, 70 हजार sqft परिसरा अन् 700 कोटी खर्च; UAE मध्ये पहिले हिंदू मंदिर तयार

Hindu Temple in UAE: संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये पहिले हिंदूमंदिर बांधले जात आहे. अबुधाबीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तब्बल 70 हजार चौरस फुटांमध्ये पसरलेल्या या मंदिराच्या उभारणीसाठी एकूण 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात यूएईला भेट देऊन या मंदिराचे उद्घाटन करू शकतात.

BAPS द्वारे मंदिराची उभारणी
बोचासन निवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) या मंदिराची उभारणी करत आहे. याच संस्थेने दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आणि अमेरिकेतील न्यू जर्सी येथे नुकतेच आशिया बाहेरचे सर्वात मोठे मंदिर बांधले आहे. BAPS ने जगभरात 1100 हून अधिक हिंदू मंदिरे बांधली आहेत. अबुधाबीमध्ये बांधण्यात येत असलेल्या हिंदू मंदिराची उंची 108 फूट आहे. या मंदिरात 40 हजार घनमीटर संगमरवरी आणि 1 लाख 80 हजार घनमीटर वाळूचा खडक वापरण्यात आला आहे.

मंदिरात स्थापित मूर्ती भारतातील कारागिरांनी तयार केल्या आहेत. मंदिराच्या बांधकामात 50 हजारांहून अधिक लोकांनी योगदान दिले आहे. यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अभिनेता संजय दत्त आणि अक्षय कुमारसह अनेकांचा समावेश आहे. मंदिर परिसरात मोठे गार्ड आणि लहान मुलांसाठी खेळाचे मैदानही असेल.

पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन
या मंदिराचे उद्घाटन फेब्रुवारीमध्ये होणार असून त्यात अनेक मान्यवरही सहभागी होणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला पीएम मोदी आणि अबुधाबीचे शेख देखील उपस्थित राहू शकतात. अबुधाबीमध्ये 10 फेब्रुवारीपासून 'फेस्टिव्हल ऑफ हार्मनी' सुरू होत आहे, ज्यामध्ये भारतीय समुदायाचे लोक सहभागी होणार आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे. 

2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी UAE दौऱ्यावर होते आणि यावेळी तेथील राष्ट्रपतींनी अबुधाबी-दुबई महामार्गावर भारताला 17 एकर जमीन भेट दिली होती. याच जागेवर हे मंदिर उभारले जात आहे. मंदिराचे बांधकाम 2015 पासून वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर बांधण्यासाठी स्टील किंवा काँक्रीटचा वापर केला गेला नाही. मंदिर इतके मजबूत केले आहे की ते पुढील 1000 वर्षे अबाधित राहील. 

Web Title: 108 feet height, 70 thousand sqft area; First Hindu temple built in UAE , pm-modi-will-inaugurate-in-february

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.