११ नातेवाइकांची हत्या करुन केली आत्महत्या!
By admin | Published: January 2, 2017 01:56 AM2017-01-02T01:56:10+5:302017-01-02T01:56:10+5:30
नववर्षाचा उत्सव साजरा करत असताना ब्राझीलच्या कॅम्पिनास येथील इसमाने त्याच्या विभक्त झालेल्या पत्नी, मुलासह ११ नातेवाइकांची गोळय़ा घालून हत्या केल्याची घटना
Next
कॅम्पिनास: नववर्षाचा उत्सव साजरा करत असताना ब्राझीलच्या कॅम्पिनास येथील इसमाने त्याच्या विभक्त झालेल्या पत्नी, मुलासह ११ नातेवाइकांची गोळय़ा घालून हत्या केल्याची घटना शनिवारी उत्तररात्री (स्थानिक वेळ) घडली. या घटनेनंतर मारेकर्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आरोपी सिडने रॅमीस डे अँरोजो हा त्यांच्या पत्नीने केलेल्या पुनर्विवाहामुळे चिडला होता. शनिवारी मध्यरात्री नववर्षाचा उत्सव सुरु असताना त्याने घराच्या कुंपनावरुन आत प्रवेश केला व ९ मिमी. बोअरच्या पिस्तुलाने अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये पत्नी मुलासह अकरा जण मृत्युमुखी पडलेत.