येमेनमधून सुटका केलेले ११ भारतीय पाकिस्तानात
By admin | Published: April 8, 2015 01:01 AM2015-04-08T01:01:20+5:302015-04-08T01:01:20+5:30
युद्धग्रस्त येमेनमधून पाकिस्तानींसह ११ भारतीयांना घेऊन आलेले पाक नौदलाचे जहाज मंगळवारी येथे दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ
कराची : युद्धग्रस्त येमेनमधून पाकिस्तानींसह ११ भारतीयांना घेऊन आलेले पाक नौदलाचे जहाज मंगळवारी येथे दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शेजारधर्माचे पालन करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलत या भारतीयांना मायदेशी नेण्यासाठी विशेष विमान देऊ केले. या भारतीयाची पाकच्या नौदल जहाजाने गेल्या आठवड्यात सुटका केली होती.
येमेनमधून सुटका करण्यात आलेल्या भारतीयांची भेट घेण्यासाठी भारतीय उच्चायुक्तालयाचे एक पथक कराची बंदरावर उपस्थित होते. आम्ही आमच्या या नागरिकांना शक्य ती सर्व मदत करणार आहोत, असे उच्चायुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले. ११ भारतीयांसह इतर १७१ जण कराचीमध्ये दाखल झाले.
या भारतीयांना मायदेशी नेण्यासाठी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी विशेष विमान देऊ केले. भारतीय उच्चायुक्तालयाने शरीफ यांनी दर्शविलेल्या सदिच्छेबद्दल त्यांचे आभार मानले. (वृत्तसंस्था)