चीनमध्ये खाण अपघातात 11 ठार

By admin | Published: May 17, 2014 10:59 PM2014-05-17T22:59:17+5:302014-05-17T22:59:17+5:30

चीनच्या वायव्य भागात एका कोळसा खाणीत पाईपलाईन तुटून झालेल्या अपघातात 11 कामगार ठार झाले.

11 killed in mine accident in China | चीनमध्ये खाण अपघातात 11 ठार

चीनमध्ये खाण अपघातात 11 ठार

Next
>बीजिंग : चीनच्या वायव्य भागात एका कोळसा खाणीत पाईपलाईन तुटून झालेल्या अपघातात 11 कामगार ठार झाले. शांक्सी प्रांताच्या युलिन शहरातील राष्ट्रीय कोळसा समूहाच्या खाणीत गेल्या बुधवारी हा अपघात झाला होता. उल्लेखनीय म्हणजे ही खाण अजून कार्यरत व्हायची आहे.
सिमेंटची मुख्य वाहिनी फुटली त्यावेळी खाणीत 37 कामगार होते. बचाव दलाच्या कर्मचा:यांनी कोळसा खाणीतून 11 प्रेत काढले. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर बाहेर आणण्यात आलेल्या 26 जणांपैकी 2 मृत होते. 24 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. बचाव दलाचे कर्मचारी अजून दोन बेपत्ता कर्मचा:यांचा शोध घेत आहेत. 
मात्र, कुणीही जिवंत असण्याची शक्यता मावळली आहे. कामगारांनी खाणीत एक लिफ्ट उभारली होती. यामुळे मदत कार्यात गती येईल, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 11 killed in mine accident in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.