फेसबुकमधून पुन्हा ११ हजार जणांना काढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 05:55 AM2023-03-12T05:55:52+5:302023-03-12T05:57:20+5:30
खर्च कमी करण्यासाठी प्रकल्पांचे काम थांबविण्याचा निर्णय
वाॅशिंग्टन: साेशल मीडियावरील फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’ पुन्हा कर्मचारी कपात करणार आहे. सुमारे११ हजार कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढणार आहे. गेल्यावर्षीदेखील कंपनीने एवढ्याच लाेकांना नारळ दिला हाेता.
अमेरिकेतील अनेक टेक कंपन्यांनी २०२२ मध्ये माेठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली हाेती. त्यानंतर पुन्हा कपातीची याेजना आखणारी मेटा ही पहिलीच कंपनी ठरू शकते. यावर्षी पहिल्या टप्प्यातील कपातीची घाेषणा पुढील आठवड्यात हाेण्याची शक्यता आहे. यावेळी बिगर तांत्रिक कर्मचाऱ्यांना माेठा फटका बसू शकताे. कंपनीने खर्च कमी करण्यासाठी काही प्रकल्पांचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने या कपातीकडे पाहण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"