Mobile Explodes : व्हिएतनाममध्ये ऑनलाईन क्लास दरम्यान मोबाईलचा स्फोट, 11 वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 03:20 PM2021-10-20T15:20:07+5:302021-10-20T15:21:09+5:30
Mobile Explodes : 11 वर्षीय मुलगा शाळेने पाठवलेल्या व्हिडिओ लिंकद्वारे घरून ऑनलाईन क्लास अटेंड करत होता.
व्हिएतनाममध्ये (Vietnam) एका ऑनलाईन क्लास (Online Class)दरम्यान मोबाईलचा स्फोट (Mobile Explodes) होऊन 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुलगा मोबाईल चार्जिंग लावून ऑनलाईन क्लास अटेंड करत होता. यादरम्यान, मोबाईलमध्ये स्फोट झाला. या स्फोटात मुलाचा भाजून मृत्य झाला. (11-Year-Old Boy Dies After Mobile Phone Explodes In His Hand While Attending Online Class)
'द सन यूके' च्या अहवालानुसार, कोरोना (Corona) संकटामुळे व्हिएतनाममध्ये मुलांना ऑनलाईन क्लासेसद्वारे शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे 11 वर्षीय मुलगा शाळेने पाठवलेल्या व्हिडिओ लिंकद्वारे घरून ऑनलाईन क्लास अटेंड करत होता. व्हिएतनाममधील एका शिक्षणाधिकाऱ्याने सांगितले की, मुलगा मोबाईल चार्जिंग लावून क्लास अटेंड करत होता. त्याने इयरफोनही घातला होता. पण या दरम्यान, अचानक मोबाईलचा स्फोट झाला आणि मुलाच्या कपड्यांना आग लागली. यामध्ये मुलगा गंभीर जमखी झाला.
अहवालानुसार, या अपघातानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला. 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ही घटना घडली. मात्र, मुलगा कोणत्या प्रकारचा फोन किंवा चार्जर वापरत होता, हे अद्याप कळलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
काय म्हणाले अधिकारी?
या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिएतनामच्या नाम दान जिल्ह्यात (Nam Dan District) आता शाळा सुरू झाल्या आहेत, पण कोरोनामुळे मुलांना आठवड्यातून एकदा ऑनलाईन क्लास अटेंड करावा लागतो. हा मुलगा ऑनलाईन क्लास अटेंड करत होता, त्यावेळी त्याच्यासोबत ही वेदनादायक घटना घडली.