इसिसच्या हल्ल्यात ११५ ठार

By admin | Published: July 19, 2015 02:16 AM2015-07-19T02:16:54+5:302015-07-19T02:16:54+5:30

इराकच्या दियाला प्रांतातील एका बाजारपेठेत इस्लामिक स्टेटने (इसिस) केलेल्या हल्ल्यात महिला व मुलांसह ११५ लोक ठार झाले. पवित्र रमजान महिना समाप्त झाला असतानाच

115 killed in Isis attacks | इसिसच्या हल्ल्यात ११५ ठार

इसिसच्या हल्ल्यात ११५ ठार

Next

बगदाद : इराकच्या दियाला प्रांतातील एका बाजारपेठेत इस्लामिक स्टेटने (इसिस) केलेल्या हल्ल्यात महिला व मुलांसह ११५ लोक ठार झाले. पवित्र रमजान महिना समाप्त झाला असतानाच प्रचंड रक्तपात घडवून आणण्यात आल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
मृत व जखमींत बहुतांश शिया मुस्लिम असून रमजान समाप्तीनंतर ते बाजारात गोळा झाले होते. इराकमधील शिया मुस्लिमांचा रमजान शुक्रवारी संपला. खान बेनी साद शहरातील गजबजलेल्या बाजारात शुक्रवारी रात्री स्फोटके लादलेल्या छोट्या ट्रकचा स्फोट घडवून आणण्यात आला व त्यामुळे आनंदाचे वातावरण दु:खात रूपांतरित झाले. दहा वर्षांतील सर्वांत भीषण असा हल्ला होता. चोहीकडे लोकांच्या शरीराची अवयवे विखुरलेली होती. हल्ल्यात १७० जण जखमी झाले आहेत. मृतांत १५ हून अधिक बालकांचाही समावेश आहे. एका शिया नागरिकाने सांगितले की, दरवर्षी रमजानदरम्यान बॉम्बहल्ला होतो. आमचा दोष हा आहे की आम्ही शिया आहोत. हा दियालातील २००३ नंतरचा सर्वांत मोठा हल्ला होता. खान बेनी साद शहर दियाला प्रांतात असून हा प्रांत अलीकडेच इस्लामिक स्टेटच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला आहे. हा प्रांत ताब्यात घेण्यासाठी इसिस इराकी सुरक्षा दले आणि कुर्दिश सैन्याशी संघर्ष करीत आहे.

Web Title: 115 killed in Isis attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.