अफगाणमध्ये वर्षभरात ११,५०० नागरिक मृत
By admin | Published: February 7, 2017 02:15 AM2017-02-07T02:15:43+5:302017-02-07T02:15:43+5:30
अफगाणिस्तानात २०१६ यावर्षात जवळपास ११,५०० नागरिक ठार वा जखमी झाले आहेत. ही त्या देशातील सर्वात जास्त संख्या असून त्यात एक तृतियांश लहान मुले आहेत.
काबूल : अफगाणिस्तानात २०१६ यावर्षात जवळपास ११,५०० नागरिक ठार वा जखमी झाले आहेत. ही त्या देशातील सर्वात जास्त संख्या असून त्यात एक तृतियांश लहान मुले आहेत.
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व जखमी झालेल्यांमध्ये लढाईत सहभागी नसलेले लोक आहेत. नागरिक ठार होणे वा जखमी होणे याचे मुख्य कारण हे अफगाणिस्तानचे सुरक्षा सैनिक आणि अतिरेकी यांच्यातील संघर्ष तोही विशेषत: नागरिक राहात असलेल्या भागांत. दोन वर्षांपूर्वी ‘नाटो’ची अतिरेक्यांशी लढण्याची मोहीम संपल्यानंतरची ही ताजी आकडेवारी आहे. सुरक्षादले आणि अतिरेकी यांच्यातील संघर्षात मरण पावलेले आणि जखमी झालेल्यांची नोंद ठेवण्याचे काम २००९ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी सुरू केले होते.
मृतांमध्ये ३,५०० पेक्षा जास्त मुले आहेत. एक वर्षापूर्वी मृत मुलांची जी संख्या होती, त्यात गेल्या वर्षी २४ टक्क्यांची वाढ झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे.