म्यानमार विमान अपघातात 116 जणांना जलसमाधी?

By admin | Published: June 7, 2017 05:17 PM2017-06-07T17:17:30+5:302017-06-07T19:48:58+5:30

म्यानमारमध्ये 116 प्रवाशांना घेऊन जाणा-या बेपत्ता लष्करी विमानाचे अवशेष सापडल्याचे वृत्त आहे.

116 people in Myanmar plane crash, water resources | म्यानमार विमान अपघातात 116 जणांना जलसमाधी?

म्यानमार विमान अपघातात 116 जणांना जलसमाधी?

Next
ऑनलाइन लोकमत
यंगून, दि. 07 - म्यानमारमध्ये 116 प्रवाशांना घेऊन जाणा-या बेपत्ता लष्करी विमानाचे अवशेष सापडल्याचे वृत्त आहे. 
म्यानमारमधील डवाई शहरापासून 218 किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रात बेपत्ता लष्करी विमानाचे अवशेष सापडल्याचे मायईक येथील पर्यटन अधिकारी नाईंग लिन झॉ यांनी सांगितले. तसेच, या ठिकाणी नौदलाचे सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु असल्याचेही ते म्हणाले. 
आज दुपारच्या सुमारास 116 प्रवाशांना घेऊन जाणारे लष्करी विमान बेपत्ता झाले होते. याबाबत लष्कर कार्यालय आणि विमानतळाच्या अधिका-यांनी अधिकृत माहिती दिली होती. मान्यमारमधील दक्षिणेकडील मायईक आणि यंगून शहरातच्या परिसरात लष्करी विमान बेपत्ता झाल्याचे सांगितले होते.  या विमानात 105 प्रवासी आणि 11 क्रू मेंबर होते.  डवाई शहराच्या आसपास विमान पोहचल्यानंतर या विमानाच्या संपर्क तुटला. ही घटना दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर विमानाचा शोध घेण्यासाठी लष्कराचे पथक रवाना झाले होते. 
 
दरम्यान, तांत्रिक कारणामुळे विमानाचा संपर्क तुटल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 

E Debris from Myanmar military plane found in sea, reports AFP quoting official

Web Title: 116 people in Myanmar plane crash, water resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.