११.६० लाख कोटी खाक; कॅलिफोर्नियात आग आटोक्यात आणण्यात अद्याप अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 06:16 IST2025-01-13T06:15:55+5:302025-01-13T06:16:21+5:30

वाऱ्याचा वेग वाढत असल्याने आग आणखी पसरत चालली आहे.

11.60 lakh crores burnt, still no success in controlling fire in California | ११.६० लाख कोटी खाक; कॅलिफोर्नियात आग आटोक्यात आणण्यात अद्याप अपयश

११.६० लाख कोटी खाक; कॅलिफोर्नियात आग आटोक्यात आणण्यात अद्याप अपयश

लॉस एंजेलिस : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेल्या ६ दिवसांपासून लागलेली आग अद्याप आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. या आगीत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक  बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

वाऱ्याचा वेग वाढत असल्याने आग आणखी पसरत चालली आहे. सध्या ताशी ८० किमी वेगाने वारे वाहत असून, त्याचा वेग वाढण्याची भीती आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी  मेक्सिकोहून अग्निशमन दल दाखल झाले आहे.

आगीच्या संकटादरम्यान, कॅलिफोर्नियातील सांता मोनिका शहरात लुटमारीची घटना घडली आहे. त्यानंतर, प्रशासनाने कर्फ्यू जाहीर केला आहे. या प्रकरणी २० जणांना अटक करण्यात आली आहे. आगीमुळे येथील प्रमुख महामार्गही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
सर्वकाही संपले आहे.

अल्टाडेनाचे रहिवासी जोस लुईस गोडिनेझ म्हणाले की, त्यांच्या कुटुंबातील १० पेक्षा जास्त सदस्यांची तीन घरे उद्ध्वस्त झाली आहेत. सर्वकाही संपले आहे. माझे संपूर्ण कुटुंब त्या तीन घरांमध्ये राहत होते.

कॅलिफोर्निया विद्यापीठापर्यंत आग? 
जगप्रसिद्ध जे.पॉल गेटी म्युझियम आणि कॅलिफोर्निया विद्यापीठापर्यंत आग पोहोचू नये, यासाठी अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मँडेविल कॅनयनमधीलही आग विझविण्याचे मोठे प्रयत्न सुरू आहेत.

नुकसान आणखी वाढण्याची भीती
रॉयटर्सच्या मते, लॉस एंजेलिसमधील आगीमुळे अंदाजे १५० अब्ज डॉलर्सचे (११.६० लाख कोटी) नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

जळालेल्या घरांकडे जाऊ नका
अधिकाऱ्यांनी लोकांना जळालेल्या घरांकडे न परतण्याचा न सल्ला दिला आहे. काही रहिवासी त्यांच्या आठवणी शोधण्यासाठी घरांकडे जात आहेत. मात्र, राखेमध्ये  हानिकारक पदार्थ असू शकतात. त्यामुळे राखेत जाऊ नये.

०८ महिन्यांहून लॉस एंजेलिसमध्ये  पाऊस झालेला नाही. त्यामुळे आग वेगाने पसरत आहेत.
१४५ चौरस किलोमीटर क्षेत्राला आगीने वेढले आहे. त्यामुळे हजारो लोकांना बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१२ हजारांहून अधिक इमारती नष्ट झाल्या आहेत. यात घरे, अपार्टमेंट इमारती, व्यावसायिक इमारती नष्ट झाल्या आहेत.

Web Title: 11.60 lakh crores burnt, still no success in controlling fire in California

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.