सोमालियात हल्ल्यात १२ ठार
By admin | Published: November 1, 2015 11:48 PM2015-11-01T23:48:07+5:302015-11-01T23:48:07+5:30
सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये एका हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात १२ जण ठार झाले आहेत. पोलीस अधिकारी मोहंमद हसन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
मोगादिशू : सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये एका हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात १२ जण ठार झाले आहेत. पोलीस अधिकारी मोहंमद हसन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
पोलिसांनी सांगितले की, अल शबाब या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. शहाफी हॉटेलच्या गेटवर स्फोटकांनी भरलेली एक कार आदळली. या स्फोटानंतर काही बंदूकधारी या हॉटेलमध्ये घुसले; मात्र सोमालियाच्या सुरक्षा बलाने या हॉटेलवर आता नियंत्रण मिळविले आहे. या हल्ल्यात माजी सैन्यप्रमुख अब्दीकरीम आणि हॉटेलचे मालक अब्दिराशीद इल्कायत हे मारले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पहिल्या कारस्फोटानंतर काही वेळातच या हॉटेलच्या बाहेर दुसरा स्फोट झाला. यात काही नागरिक मारले गेले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही पहिल्या हल्ल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण आणत असतानाच हा दुसरा हल्ला झाला.