कच-यात फेकून दिले १२ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 04:55 AM2018-02-22T04:55:06+5:302018-02-22T04:55:12+5:30
वेंधळेपणामुळे किंवा कसल्या तरी गडबडीत लोक काय करतील, हे सांगता येत नाही. चीनच्या लियाओनिंग प्रांतातलील वांग नावाचे एक गृहस्थ घाईघाईने घरातून बाहेर पडले
वेंधळेपणामुळे किंवा कसल्या तरी गडबडीत लोक काय करतील, हे सांगता येत नाही. चीनच्या लियाओनिंग प्रांतातलील वांग नावाचे एक गृहस्थ घाईघाईने घरातून बाहेर पडले आणि जाताना त्यांनी साडेबारा लाख रुपयांच्या आसपास असलेल्या रकमेची पिशवी कचºयाच्या डब्यात फेकून दिली.
ते पुढे गेले बँकेत. त्यांना ही रक्कम बँकेत जमा करायची होती. त्यासाठी त्यांनी हातातली पिशवी उघडलं, तेव्हा त्यात होता फक्त कचरा. आपण कचरा घेऊ न बँकेत का आलो, हे सुरुवातीला त्यांच्या लक्षातच आलं नाही. बँकेतले कर्मचारीही त्याच्या पिशवीतला कचरा पाहून हसायला लागले. बहुधा आपण कचºयाच्या डब्यात पैशांची पिशवी टाकून दिली असावी, असं त्यांच्या लक्षात आलं. ते घाईघाईने घराजवळच्या कचºयाच्या डब्यापाशी गेले. पण तिथं ती पिशवी नव्हती. आपल्या मूर्खपणामुळे १२ लाखांचं नुकसान झाल्याबद्दल ते स्वत:च्या नशिबालाच दोष देत राहिले. तरीही आशेनं ते पोलीस स्टेशनात गेले. तिथं तक्रार नोंदवली. ही तक्रार ऐकून पोलीसही हसू लागले. तरीही ते कचºयाच्या डब्यापाशी गेले. तिथं शोधाशोध केली. सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासलं. पण पैशांचा तपासच लागेना. सीसीटीव्ही फुटेज खूपच अस्पष्ट असल्यानं तिथं कोण कोण आलं होतं, कोणी ती पिशवी उचलली, हे पोलिसांना समजू शकलं नाही. आता मात्र वांग पुरता निराश झाले. पोलिसांनी मात्र कचºयाच्या डब्याच्या आसपास राहणाºयांची तोपर्यंत चौकशीही सुरू केली होती. त्यावेळी एक महिला पुढे आली. ती आपल्या घरातील कचरा फेकायला गेली, तेव्हा तिला डब्यात ही पैशांची पिशवी सापडली. तिनं ती घरी आणली. पण पोलिसांची चौकशी करताच, तिनं ती परत केली. तिनं ती रक्कम असलेली पिशवी
घरी नेली खरी, पण आपण जे केलंय, ते बरोबर नाही, असं तिला मनातून वाटत होतं. त्यामुळे ती स्वत:हून ती पिशवी घेऊ न पोलिसांकडे जाणार होती. पण तोपर्यंत पोलीसच तिच्या घरापर्यंत आले. तिनं परत केलेली पिशवी पोलिसांनी वान यांच्याकडे सुपूर्द केली. तिच्या या इमानदारीवर खूश झालेल्या वान यांनी तिला २0 हजार रुपये बक्षीसही दिलं.