१२ वर्षांच्या अनन्याने जिंकली स्पेलिंग स्पर्धा
By admin | Published: June 3, 2017 01:19 AM2017-06-03T01:19:55+5:302017-06-03T01:19:55+5:30
अनन्या विनय या अवघ्या १२ वर्षांच्या भारतीय अमेरिकी मुलीने प्रतिष्ठेची स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा जिंकून ४० हजार
वॉशिंग्टन : अनन्या विनय या अवघ्या १२ वर्षांच्या भारतीय अमेरिकी मुलीने प्रतिष्ठेची स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा जिंकून ४० हजार अमेरिकन डॉलरचे रोख बक्षीस पटकावले. मेरोकीन (टं१ङ्मूं्रल्ल) या इंग्रजी शब्दाचे अचूक शब्दलेखन केल्यानंतर तिने हा बहुमान मिळविला. ही स्पर्धा सलग जिंकणारी ती १३ वी भारतीय-अमेरिकन समुदायाची आहे.
१२ तासांच्या या स्पर्धेत तिने ३५ इंग्रजी शब्द (स्पेलिंग) अचूकपणे लिहिले. तिचा प्रतिस्पर्धी रोहन राजीव (वय १४) हासुद्धा भारतीय अमेरिकन असून त्याला मरयम (टं११ें) हा शब्द अचूक लिहिता आला नाही. अनन्या जिंकण्यासाठीच या स्पर्धेत सहभागी झाली होती, अशा शब्दांत संयोजकांनी कौतुक केले. (वृत्तसंस्था)
मी खूप आनंदी आहे. स्वप्न साकार झाले. अचूक शब्दलेखन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेतील अंतिम शब्द समाजशास्त्र विषयात वाचण्यात आला होता. - अनन्या