१२ वर्षांच्या मुलाने कार चालवून १३०० कि.मी. अंतर केले पार
By admin | Published: April 26, 2017 12:58 AM2017-04-26T00:58:24+5:302017-04-26T00:58:24+5:30
आॅस्ट्रेलियात १२ वर्षांच्या मुलाला पोलिसांनी पकडले आहे. या मुलाने स्वत: १३०० कि.मी. कार चालवली होती. या मुलाला शनिवारी न्यू
सिडनी : आॅस्ट्रेलियात १२ वर्षांच्या मुलाला पोलिसांनी पकडले आहे. या मुलाने स्वत: १३०० कि.मी. कार चालवली होती. या मुलाला शनिवारी न्यू साऊथ वेल्समधील ब्रोकेन हिल भागात अडविण्यात आले. त्याच्या कारचे बंपर जमिनीला घासत होते. त्यामुळे पोलिसांचे लक्ष त्याच्या कारकडे गेले. हा मुलगा पश्चिम आॅस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या कँडाल येथून पर्थपर्यंत ४००० कि. मी.चा प्रवास करण्याच्या प्रयत्नात होता. त्याला ताब्यात घेऊन ब्रोकेन हिल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मुलाच्या आई-वडिलाने आपला मुलगा हरवल्याची पोलिसांत तक्रार दिली होती. हा मुलगा घरची कार घेऊन निघाला होता. तो घराबाहेर पडल्यानंतर लगेचच कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. कोणाच्याही लक्षात न येता हा मुलगा एवढ्या दूरपर्यंत कसा आले हे एक कोडेच आहे. त्याने संपूर्ण साऊथ वेल्सचा दौरा केला. प्रवासादरम्यान त्याने अनेक निर्मनुष्य आणि अत्यंत खराब रस्ते पार केले. या मुलावर किशोरवयीन गुन्हेगार कायद्यान्वये खटला चालविला जाऊ शकतो, असे एका पोलीस प्रवक्त्याने सांगितले.