१२ वर्षांच्या मुलावर पितृत्व लादणाऱ्या महिलेस कारावास!

By Admin | Published: July 28, 2015 03:25 AM2015-07-28T03:25:11+5:302015-07-28T03:25:11+5:30

एका १२ वर्षांच्या कोवळ््या मुलाकडून नियमितपणे संभोग करून घेऊन त्याच्यापासून एक मूल होऊ दिलेल्या एका महिलेस आॅस्ट्रेलियातील न्यायालयाने सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

12-year-old son imprisoned for paternity | १२ वर्षांच्या मुलावर पितृत्व लादणाऱ्या महिलेस कारावास!

१२ वर्षांच्या मुलावर पितृत्व लादणाऱ्या महिलेस कारावास!

googlenewsNext

मेलबर्न : एका १२ वर्षांच्या कोवळ््या मुलाकडून नियमितपणे संभोग करून घेऊन त्याच्यापासून एक मूल होऊ दिलेल्या एका महिलेस आॅस्ट्रेलियातील न्यायालयाने सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
व्हिक्टोरिया कौंटीमधील न्यायालयाने ही शिक्षा देताना या ३६ वर्षांच्या महिलेस लैंगिक अत्याचाराखेरीज त्या ‘मुलाचे बालपण हिरवून घेतल्याबद्दल’ दोषी ठरविले. आरोपी महिलेने आपली विकृत लैंगिक भूक भागविण्यासाठी या मुलाला नादी लावले, हे उघड आहे. याच दृष्टीने त्या मुलाचे भावी आयुष्य खराब होऊ नये यासाठी न्यायालयाने आरोपी महिला व अत्याचारित मुलाचे नाव प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध केला आहे.
न्यायाधीश जेन पॅट्रिक यांनी आरोपी महिलेने गुन्हे कबूल केल्यानंतर ही शिक्षा ठोठावली.
या मुलाच्या आईने न्यायालयापुढे येऊन आरोपी महिलेच्या या दुष्कृत्यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य कसे विस्कटले आहे, हे विषद केले. त्याचा हवाला देत शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी आरोपी महिलेस सांगितले की, आपण जे करीत आहोत ते सर्वस्वी चुकीचे आहे, याची जाणीव असूनही तू तेच वर्तन करीत राहिलीस. तू त्या निष्पाप मुलाचे बालपणच हिरावून घेतलेस. त्याच्यावर तू पितृत्व लादलेस आणि त्याच्याशी जुळवून घेण्याचे त्या बापड्याचे वयही नाही! (वृत्तसंस्था)

दि मेलबर्न एज वृत्तपत्राने याविषयी दिलेल्या वृत्तानुसार ही आरोपी महिला तीन मुलांची आई आहे. तिने ज्या मुलावर असे लैंगिक अत्याचार केले तो शाळेत तिच्याच मुलीच्या वर्गात होता. ही महिला त्या दोघांना आपल्या मोटारीतून शाळेत सोडायची व आणायची. तिचे या मुलावर प्रमे बसले व तिने कोणतीही कुटुंब नियोजन साधने न वापरता सुमारे दोन वर्षे या मुलाकडून नियमितपणे संभोग करवून घेतला. यातून तिला दिवस गेले व गेल्या मे महिन्यांत तिने एका मुलीला जन्म दिला.
हा प्रकार त्या मुलाच्या घरी समजला तेव्हा त्याच्या घरच्यांनी या महिलेला जाब विचारला. तिने इन्कार केल्यावर प्रकरण पोलिसांकडे गेले. पुढे डीएनए चाचणीतून तिला झालेले मूल याच मुलापासून झाल्याचे निष्पन्न झाले.
अशा प्रकारे या महिलेच्या लैंगिक अत्याचारास बळी पडलेला हा मुलगा आता वयाच्या १४ व्या वर्षी एका नको असलेल्या मुलीचा पिता झाला आहे.

Web Title: 12-year-old son imprisoned for paternity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.