अफगाणमध्ये हिमस्खलनात १२४ जणांचा बळी; वीज खंडित

By admin | Published: February 25, 2015 11:48 PM2015-02-25T23:48:47+5:302015-02-25T23:48:47+5:30

अफगाणिस्तानातील हिमस्खलनात १२४ जणांचा बळी गेल्याची भीती आपत्कालीन सेवेच्या एका अधिका-याने बुधवारी व्यक्त केली. प्रचंड बर्फवृष्टीमुळे हिमस्खलन होऊन अनेक घरे थंड ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचे हा

124 people killed in Afghan avalanche; Power breaks | अफगाणमध्ये हिमस्खलनात १२४ जणांचा बळी; वीज खंडित

अफगाणमध्ये हिमस्खलनात १२४ जणांचा बळी; वीज खंडित

Next

काबूल : अफगाणिस्तानातील हिमस्खलनात १२४ जणांचा बळी गेल्याची भीती आपत्कालीन सेवेच्या एका अधिका-याने बुधवारी व्यक्त केली. प्रचंड बर्फवृष्टीमुळे हिमस्खलन होऊन अनेक घरे थंड ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचे हा अधिकारी म्हणाला.
हिमस्खलनाचा चार प्रांताना फटका बसला असला तरी पांजशिर प्रांतात सर्वाधिक हानी झाली आहे. प्रभावित प्रांत देशाच्या ईशान्येकडील असून तेथे गेल्या दोन दिवसांपासून हिमपात सुरू आहे.
अफगाणिस्तानच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपसंचालक मोहंमद असलम सयास यांनी हिमस्खलन बळींचा आकडा दिला. एकट्या पांजशिर प्रांतात १०० घरे जमिनदोस्त झाली किंवा त्यांची हानी झाली, असे ते म्हणाले. हा प्रांत राजधानी काबूलपासून १०० कि. मी.वर ईशान्येकडे आहे.
अफगाणिस्तानातील हिवाळा एरवी सौम्य व कोरडा असतो. मात्र, यावेळी शक्तीशाली हिमवादळाने त्यात व्यत्यय आणला. परिणामी देशाचा मोठ्या भुभागावर बर्फाची चादर पसरली आहे. बर्फ साचून मुख्य रस्ते बंद झाल्यामुळे प्रभावित गावांमध्ये पोहोचणे बचाव पथकांना कठीण झाले आहे. हिमवादळ आणि हिमस्खलनाने सलांग खिंडीत वीजवाहिन्यांची हानी झाल्यामुळे काबूलच्या अनेक भागांत मंगळवारी वीजपुरवठा खंडित राहिला. सलांग खिंड वाहतुकीसाठी आजही बंद ठेवण्यात आली. अफगाणिस्तानातील उंच पहाडी भागात हिवाळ्यात दरवर्षी हिमस्खलन होते. २०१२ मध्ये अशाच एका हिमस्खलनात १४५ लोक बेपत्ता झाले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: 124 people killed in Afghan avalanche; Power breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.