सव्वाशे तृतीयपंथी लक्ष ठेवणार निवडणुकांवर; तपासणार पारदर्शकता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 04:53 PM2018-07-23T16:53:16+5:302018-07-23T16:54:02+5:30
निवडणूका पारदर्शक होतात की नाही हे पाहाण्याचं काम या तृतीयपंथी निरीक्षकांवर सोपवलं आहे.
इस्लामाबाद- पाकिस्तानात होत असलेल्या मतदान प्रक्रिया आणि निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी 125 तृतीयपंथींची नेमणूक करण्यात आली आहे. हे तृतीयपंथी मतदान व इतर प्रक्रियेतील पारदर्शकता आणि व्यवस्था यांच्यावर लक्ष ठेवणार आहेत.
ट्रस्ट फॉर डेमोक्रॅटिक एज्युकेशन अँड अकाऊंटेबिलिटी या एनजीओने निवडणूकेच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी काही लोकांना प्रशिक्षित केले आहे. त्यामध्ये या तृतीयपंथींचाही समावेश आहे. यासर्वांची लाहोर, कराची, इस्लामाबाद, क्वेट्टा या शहरांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.
Meet Nayyab Ali, a transgender who was forced to leave her home when she was only 13, physically and sexually abused by relatives, and later attacked with acid by her former boyfriend is one of four transgender candidates standing in #Pakistan's general election next week. pic.twitter.com/D6U0nJPbYz
— Andrea Rose (@Andyrockz2012) July 20, 2018
निवडणूक निरीक्षक म्हणून हे लोक कोठे मतदारांच्या अधिकारांचा संकोच होत असेल किंवा समाजातील अल्पसंख्यांकावर अन्याय होत असेल तर त्याची नोंद करतील.पाकिस्तानामध्ये तृतीयपंथींची 5 लाख इतकी संख्या असून 13 तृतीयपंथी ही निवडणूक लढवत आहेत.