ताजिक पोलिसांनी उतरविल्या १३ हजार नागरिकांच्या दाढ्या!

By admin | Published: January 22, 2016 02:54 AM2016-01-22T02:54:22+5:302016-01-22T02:54:22+5:30

परदेशातून होणाऱ्या धार्मिक मूलतत्ववादी विचारसरणींना थोपविण्यासाठी ताजिकिस्तानच्या निधर्मी सरकारने अत्यंत कडक पावले उचलली आहेत.

13 kg of bearded emirate from Tajik police! | ताजिक पोलिसांनी उतरविल्या १३ हजार नागरिकांच्या दाढ्या!

ताजिक पोलिसांनी उतरविल्या १३ हजार नागरिकांच्या दाढ्या!

Next

दुशान्बे (ताजिकिस्तान) : परदेशातून होणाऱ्या धार्मिक मूलतत्ववादी विचारसरणींना थोपविण्यासाठी ताजिकिस्तानच्या निधर्मी सरकारने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. शेजारील अफगाणिस्तानातील अशा विचारसरणींचा प्रभाव टाळण्यासाठी ताजिक सरकार सक्रिय झाले आहे. ताजिकिस्तानच्या पोलिसांनी याचाच एक भाग म्हणून १३ हजार लोकांना दाढी उतरवण्यासाठी राजी केले आहे तर बुरखे विकणारी १६० दुकानेही पोलिसांनी बंद केली आहेत.
ताजिकिस्तान हा मध्य आशियातील एक मुस्लिम बहुसंख्य देश असून त्याच्या शेजारी अफगाणिस्तान, उझबेकीस्तान, कझाखस्तान, किरगिझीस्तान, चीनचा उइघुर प्रांत आहे. त्यामुळे मुलतत्ववादी विचारसरणी आपल्या देशामध्ये शेजारील देशातून आयात केली जाऊ नये यासाठी येथील सरकार पावले उचलत आहे. त्यामुळेच दाढी, बुरखे असे संकेत पाळण्यास सरकार विरोध करत असून नागरिकांना तसे न करण्यासाठी समजावत आहे. नैऋत्य खातलॉन प्रांताचे पोलीसप्रमुख बाहरोम शरिफजोदा यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी १७०० मुली व स्त्रियांना बुरखा न वापरण्यासाठी समजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वर्षीच देशातील एकमेव नोंदणीकृत इस्लामी पक्ष इस्लामिक रेनेसाँ पार्टीवर बंदी आणली आहे.
अफगाणिस्तानातून येणारे विचारप्रवाह थोपविण्यासाठी ताजिक संसदहीतितकीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. मागच्याच आठवड्यात ताजिक संसदेने मंजूर केलेल्या विधेयकानुसार अरेबिक उच्चारांची ह्यपरदेशीह्ण नावे ठेवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नातेवाईकांमध्ये विवाह करण्याची परंपराही बंद करण्यात आली आहे.
देशाच्या स्थिरतेसाठी प्रयत्न -राष्ट्राध्यक्ष
ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली राहमोन यांची प्रशासनावर चांगलीच पकड आहे. ते १९९४ पासून या पदावरती असून आता ते चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यांचा कार्यकाळ २०२० साली संपणार आहे. राहमोन आणि त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा खटला चालविता येणार नाही अशी सूट संसदेने मंजूर केली आहे. ही सूट त्यांच्यासाठी आजीवन लागू झाली आहे.

Web Title: 13 kg of bearded emirate from Tajik police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.