मूर्तीखाली कामगारांना सापडला १३० वर्ष जुना बॉक्स, त्यात जे दिसलं ते बघून अवाक् झाले सगळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 12:32 PM2021-12-28T12:32:32+5:302021-12-28T12:36:59+5:30
130 years old box found : काही मजुरांना खोदकाम करताना एका मूर्तीखाली १३० वर्ष जुना एक बॉक्स आढळून आला. ज्याचं सत्य समोर आल्यावर लोक हैराण झाले. ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
जगभरात आजही अनेक रहस्य आहेत जे अजूनही उलगडले गेलेले नाहीत. इथे कधी काय बघायला मिळेल, काहीच सांगता येत नाही. अनेकदा तर अशा वस्तू सापडतात ज्यांवर विश्वास ठेवणं अवघड होऊन बसतं. अशीच एक घटना अमेरिकेतून समोर आली आहे. इथे काही मजुरांना खोदकाम करताना एका मूर्तीखाली १३० वर्ष जुना एक बॉक्स आढळून आला. ज्याचं सत्य समोर आल्यावर लोक हैराण झाले. ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही कामगार कॉन्फेडरेट जनरल यांच्या मूर्तीचा पाया तोडत होते. त्याच मूर्तीखाली त्यांना एक तांब्याचा जुना बॉक्स सापडला. बॉक्स बघून कामगार हैराण झाले, कारण हा बॉक्स फार जुना होता आणि सुस्थितीत होता. असा अंदाज आहे की, हा बॉक्स साधारण १३० वर्षाआधी इथे ठेवण्यात आला होता. व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी या घटनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली.
They found it! This is likely the time capsule everyone was looking for. Conservators studying it—stay tuned for next steps! (Won’t be opened today) pic.twitter.com/3lWrsPGZd2
— Governor Ralph Northam (@GovernorVA) December 27, 2021
त्यांनी ट्विट करत लिहिलं की, कदाचित ही वस्तू 'टाइम कॅप्सूल' आहे, ज्याचा सगळेजण शोध घेत आहेत. एका लेखानुसार, जनरल रॉबर्ट ई ली प्रतिमेखाली लपवलेल्या टाइम कॅप्सूलमध्ये गृहयुद्धाच्या यादगार वस्तू आणि लिंकनचे फोटो आढळून आले. याशिवाय त्यात बटन, बुलेट, कॉन्फेडरेट करन्सी, नकाशे अशाही वस्तू सापडल्या.
रिपोर्टनुसार, ही कॅप्सूल ली यांच्या कांस्याच्या मूर्तीखाली होती. याचं निर्माण १८९० करण्यात आलं होतं. असंही सांगितलं जात आहे की, या स्मारकाला वंशभेदाच्या अन्यायाचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. सध्या या बॉक्सबाबत आणखी माहिती मिळवली जात आहे. लोक याबाबत वेगवेगळी चर्चा करत आहेत.