45 वर्षीय कोट्याधीश महिलेने 14 वर्षीय मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध, अटक आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 03:13 PM2022-07-27T15:13:01+5:302022-07-27T15:14:56+5:30
Sexual Abuse : सवानावर आरोप आहे की, तिने बेकायदेशीर पद्धतीने अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवले होते. तेच तिने या मुलाला या घटनेबाबत गप्प राहण्यास सांगितलं होतं
Sexual Abuse : एका कोट्याधीश महिलेने 14 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवले होते. पोलिसांच्या चौकशीतून असंही समोर आलं की, घटनेदरम्यान ती नशेत टल्ली होती. महिलेने अल्पवयीन मुलाला गप्प राहण्यासाठी धमकावलं देखील होतं. मुलाने या घटनेबाबत त्याच्या आई-वडिलांना सांगितलं आणि ज्यानंतर या आरोपी महिलेला अटक करण्यात आली. ही घटना ऑस्ट्रेलियाची (Australia) असून 45 वर्षीय उद्योजिका सवाना डेजली हिला गंभीर आरोपांनंतर जून महिन्यात अटक करण्यात आली होती. ती प्रसिद्ध हॉर्स ब्रीडर रॉस डेजली यांची मुलगी आहे.
सवानावर आरोप आहे की, तिने बेकायदेशीर पद्धतीने अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवले होते. तेच तिने या मुलाला या घटनेबाबत गप्प राहण्यास सांगितलं होतं. त्यासाठी तिने त्याला धमकीही दिली होती. सवानाला चाइल्ड अब्यूज यूनिटने 27 जून रोजी अटक केली होती. तेव्हापासून ती तुरूंगात आहे.
तुरूंगात कैद असलेली सवाना जेव्हा कोर्टात हजर झाली तेव्हा म्हणाली की, तिला कोट्यावधी रूपयांचं नुकसान होत आहे. अशात तिला जामीन दिला जावा. तेच सवानाची आई कॅन्सरने ग्रस्त आहे. कोर्टाने महिलेच्या वकिलाचं म्हणणं ऐकल्यानंतर तिला जामीन दिला आहे.
25 जुलैला तिला पुन्हा डाउनिंग सेंटर लोकल कोर्टात हजर करण्यात आलं. सवानाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, तिला जामिनावर सोडण्यात यावं. वकिलाने दावा केला की, सवानाची मानसिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. तसेच वकिलाने यादरम्यान जामीन म्हणून 79 लाख रूपये देण्याची ऑफरही दिली.
सवानानेही विनंती करत कोर्टात सांगितलं की, तिला बिझनेसमध्ये नुकसान होत आहे. तसेच तिची आई ओवेरिअन कॅन्सरने पीडित आहे. तिला सवानाची गरज आहे. तुरूंगात राहिल्याने सवानाच्या बिझनेसचं नुकसान तर होईलच, सोबतच तिचं मानसिक आरोग्यही बिघडेल.
सवानाचे वकील ग्रॅबिएअल बशीरने कोर्टात सांगितलं की, 'केवळ ती एकटीच आहे जी तिच्या उत्पादनांवर आणि रीब्रांडींगवर काम करू शकते'.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी सांगितलं की, त्यांच्याकडे याचे पुरेसे पुरावे आहेत की, सवानाने हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी सवानाचा फोनही टटॅप केला होता. सवानाने अल्पवयीन मुलाला गप्प बसण्याची धमकीही दिली होती. तेच पोलिसांना हेही सांगितलं होतं की, दोघांमध्ये संबंध त्यांच्या सहमतीने झाले होते.
मॅजिस्ट्रेट एलिसन विले यांनी कोर्टात वकिलाचं म्हणणं ऐकून घेतल्यावर 79 लाख रूपये जामीन म्हणून स्वीकारले आणि तिला जामीन दिला. मॅजिस्ट्रेट म्हणाले की, ते या गोष्टीने संतुष्ट आहेत की, सवाना समाजासाठी कोणताही धोका नाही.
सवानाला जसा जामीन मिळाला तिने खुर्चीवरून उडी घेतली आणि अनेकदा तिने कोर्टाचे आभारही मानले. यादरम्यान कोर्टाच्या परिसरात तिचा पतीही उपस्थित होता. सशर्त जामीन मिळाल्यावर सवाना आता तिचा बिझनेस करू शकेल.