पाकमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच, हिंदू मुलीचं केलं जबरदस्तीनं धर्म परिवर्तन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 11:42 AM2020-01-22T11:42:15+5:302020-01-22T11:43:54+5:30
पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू आणि शीख अल्पसंख्याकांवर होत असलेल्या धार्मिक अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे.
इस्लामाबादः पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू आणि शीख अल्पसंख्याकांवर होत असलेल्या धार्मिक अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सिंध प्रांतातल्या जैकोबाबादमध्ये एका हिंदू मुलीचं अपहरण करून जोरजबरदस्तीनं धर्म परिवर्तन करण्यात आलं. त्यानंतर एका मुस्लिम मुलासोबत तिचं लग्न लावून दिलं. रिपोर्टनुसार सिंध प्रांतातल्या जैकोबाबादमध्ये राहणाऱ्या अरोक कुमारी ऊर्फ महक कुमारीचं 15 जानेवारीला अपहरण करण्यात आलं. त्यानंतर जैकोबाबादमधील अल्पसंख्याक समुदायातील लोक जोरदार प्रदर्शन करत आहेत.
व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून मुलगी अरोक कुमारी हिचं धर्म परिवर्तन करून मुस्लिम तरुण अली रजाबरोबर लग्न लावून दिल्याचं उघड झालं आहे. व्हिडीओमध्ये अरोक कुमारी आणि अली रजा एकत्र बसलेले दिसत आहेत. मुलगी व्हिडीओत म्हणतेय, की माझ्या मर्जीनं धर्म परिवर्तन करत मुस्लिम तरुणाबरोबर लग्न करत आहे. धर्म परिवर्तनानंतर अरोक कुमारीला अलिजा असं नाव देण्यात आलं आहे. मी माझ्या मर्जीनं धर्मात बदल करून इस्लाम कबूल केला आहे. माझं नाव अलिजा आहे. मी दर्गा अमरोत शरीफमध्ये इस्लाम स्वीकारून अली रजाशी लग्न केलं आहे. मी 18 वर्षांची आहे. मला माझे आई-वडील आणि हिंदू धर्माची सुरक्षितता हवी आहे.
जैकबाबाद में 14 साल की महक के अगवा किए जाने और ज़बरन धर्म परिवर्तन करने के ख़िलाफ़ न पुलिस ने एक्शन लिया, न कोर्ट ने अल्पसंख्यक परिवारों की सुनी और पाक सरकार भी चुप है@DrSJaishankar जी से विनती -महक को इंसाफ़ दिलाने के लिए आज ही @Paknewdelhi को सम्मन किया जाए@PTI_News@ANIpic.twitter.com/61MpHPEZEb
— Manjinder S Sirsa (@mssirsa) January 22, 2020